धर्मांतराचा प्रकार घडल्यावर सतर्क राहून कृतीशील होणारे भाजपचे अनिल राठोड यांचे अभिनंदन !

नेर, २४ जानेवारी (वार्ता.) – तालुक्यातील बाणगाव येथे बाळू चव्हाण यांच्या घरी २२ जानेवारी या दिवशी सायंकाळी ख्रिस्ती धर्माचा प्रसार चालू होता. ही गोष्ट भाजपचे तालुका अध्यक्ष अनिल राठोड यांच्या लक्षात येताच त्यांनी सहकार्यांसह घटनास्थळी पोचून ख्रिस्ती धर्मप्रसारकांना घेराव घातला; परंतु त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. राठोड यांनी नेरचे ठाणेदार ज्ञानेश्वर घुगे यांना भ्रमणभाषवरून घटनेची माहिती दिली. नेर पोलिसांनी घटनास्थळी येऊन अमरावती येथील संजय दिवे (वय ४९ वर्षे), अस्मिता दिवे (वय ५२ वर्षे), रामेश्वर दिवे (वय ३१ वर्षे), भूषण अंभोरे (वय २२ वर्षे), गौरव आत्राम (वय ३१ वर्षे) यांना अटक केली. आरोपीविरुद्ध २९५ अ, १५३ अ, १४३, १८८ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील अन्वेषण पोलीस करत आहे. तालुक्यात अनेक दिवसांपासून पैशांचे आमीष दाखवून ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करणारी टोळी सक्रीय आहे.
Only Bengali in Bengal : बंगालमध्ये १ सप्टेंबरपासून सर्व सरकारी कामकाज बंगाली भाषेत होणार ! – मुख्यमंत्री
धर्म पालटल्याने जात पालटत नाही ! : Mumbai HC Nagpur Bench
तमिळनाडू : गोहत्या करणार्यांना पाठीशी घालणार्या मुसलमान संघटनांचा हिंदुत्वनिष्ठांकडून निषेध !
Sant Balumama Devasthan Scam : तत्कालीन धर्मादाय निरीक्षक रागिणी खडके यांच्यासह कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा नोंद !
संसदेचे कामकाज गदारोळामुळे दिवसभरासाठी स्थगित
MP UCC Bill : मध्यप्रदेशाच्या मंत्रीमंडळाची समान नागरी कायद्याला संमती