चीनचे चंद्रयान चंद्रावर यशस्वीरित्या उतरले !

चीनची विस्तारवादी महत्त्वाकांक्षा पहाता उद्या चंद्रावर त्याचा अधिकार असल्याचा दावा चीनने केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

बीजिंग (चीन) – चीनने त्याचे चंद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्याचा केलेला प्रयत्न यशस्वी ठरला आहे. १ डिसेंबर या दिवशी रोबोटयुक्त ‘चँग इ-५’ हे चंद्रयान चंद्रावर उतरल्याचे चीनकडून अधिकृतरित्या सांगण्यात आले.

 (सौजन्य : Guardian News)

चंद्रावरील खडकांचे नमुने गोळा करून ते पृथ्वीवर आणण्यासाठी चीनचे मानवरहित यान ७ दिवसांपूर्वी अवकाशात प्रक्षेपित केले होते. यापूर्वी अमेरिकेने चंद्रावरील खडकांचे नमुने गोळा करण्यासाठी अवकाशवीर पाठवले होते. रशियाने खडकांचे नमुने आणण्यासाठी मानवरहित मोहिमा राबवल्या होत्या. भारतानेही हा प्रयत्न केला होता; मात्र त्यात त्याला अपयश आले होते.