नोएडा (उत्तरप्रदेश) येथे दिवाळीनिमित्त ‘ऑनलाईन’ सत्संगाचे आयोजन

दिवाळीच्या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने एका ‘ऑनलाईन’ सत्संगाचे आयोजन करण्यात आले. या सत्संगाला सनातनच्या कु. पूनम चौधरी आणि सौ. राजरानी माहूर यांनी मार्गदर्शन केले.

मालवण येथे जलक्रीडा व्यावसायिकांवर बंदर विभागाची कारवाई

१८ नोव्हेंबरला बंदर विभागाच्या पथकाने ‘जलक्रीडा’ चालू करण्याविषयी राज्यशासनाने कोणत्याही सूचना दिल्या नसल्याचे सांगत अवैधपणे व्यवसाय करणार्‍या ‘जलक्रीडा’ व्यावसायिकांवर कारवाई केली. या वेळी संतप्त व्यावसायिकांनी ‘कारवाई न थांबवल्यास समुद्रातच उपोषण करू’, अशी चेतावणी दिली

कुलभूषण जाधव यांचे अपहरण करून पाक सैन्याकडे देणारा आतंकवादी मुल्ला ओमर याला पाक सैन्यानेच केले ठार !

पाकच्या बलुचिस्तानच्या तुर्बत भागात पाकच्या सैन्याने मुल्ला ओमर या जिहादी आतंकवाद्याला आणि त्याच्या मुलाला ठार केले. मुल्ला ओमर लष्कर-ए-तोयबा, लष्कर-ए-कुरूसन आणि जैश-उल-आदल या आतंकवादी संघटनांना साहाय्य करत होता.

काँग्रेसने हकालपट्टी केलेले उर्फान मुल्ला यांचा भाजपात प्रवेश

काँग्रेसने १७ नोव्हेंबर या दिवशी पुढील ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केलेले काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे माजी प्रमुख उर्फान मुल्ला यांनी त्यांच्या समर्थकांसह १८ नोव्हेंबर या दिवशी भाजपात रितसर प्रवेश केला.

उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडून हिंदु जनसेवा समितीचा ‘कोरोना योद्धा’ म्हणून सन्मान

‘‘अशा समाजसेवी संस्था आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यामुळे राज्याला कठीण परिस्थितीत कोरोना महामारीशी सामना करता आला.’’ – उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल

अशा काँग्रेसवर बंदी घाला !

देशात मुसलमानविरोधी भावना वाढेल, यामुळे २६/११ च्या मुंबईवरील जिहादी आतंकवादी आक्रमणानंतर तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी पाकवर आक्रमण करणे टाळले, असा गौप्यस्फोट अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केला आहे.

दळणवळण बंदीच्या कालावधीत अनुभवलेली सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांची प्रीती आणि कृपा !

अंतर्मनावर साधनेचे संस्कार करण्यासाठी माझ्यापेक्षा सद्गुरु काकांनीच अधिक कष्ट घेतले आहेत आणि ते आजही अखंड साहाय्य (कृपावर्षाव) करतच आहेत. त्यांतील काही प्रसंग कृतज्ञतारूपाने श्री गुरुचरणी अर्पण करीत आहे . . .

शुक्रवार, २०.११.२०२० या दिवशी गुरु ग्रहाचा मकर राशीतील प्रवेश आणि या कालावधीत होणारे परिणाम !

‘शुक्रवार, २०.११.२०२० (कार्तिक शुक्ल पक्ष षष्ठी) या दिवशी दुपारी १.३६ वाजता गुरु हा ग्रह मकर राशीत प्रवेश करणार आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘हिंदु धर्मात धर्मप्रसारासह धर्माच्या खोलात, तसेच सूक्ष्मात जाण्याला महत्त्व आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

गुरुदेवांना अनुभवापेक्षा व्यापकता अपेक्षित असणे

आपल्या साधनेचा अधिकार सोडून गुरुदेव तो इतर कुणाला देणे शक्य आहे का ? प्रत्येकाने ‘गुरुदेवांच्या इच्छेने सर्व घडत आहे’, या सकारात्मकतेचा स्वीकार करून त्याप्रमाणे प्रयत्न करणे श्री गुरूंना अपेक्षित आहे.