गुरुदेवांना अनुभवापेक्षा व्यापकता अपेक्षित असणे

साधना शिकवून साधकांना जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त करणारी आणि संत बनवणारी सनातन संस्था

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. साधकांमध्ये व्यापकता निर्माण होण्यासाठी गुरुदेवाच्या कृपेमुळे साधकांची क्षमता आणि कौशल्य पाहून सेवा मिळणे

‘गुरुदेवांना प्रत्येक साधकाकडून उत्तरदायित्वाच्या अनुभवापेक्षा व्यापकताच अपेक्षित आहे’, हे प्रत्येक प्रसंगात लक्षात येते. गुरुदेवांच्या कृपेमुळे साधकांची क्षमता आणि कौशल्य यांनुसार सेवा मिळते, तरी ‘त्या साधकात व्यापकता कशी निर्माण होईल ? कोणत्या ठिकाणी साधकाची साधना होऊ शकते ?’, अशा ठिकाणी किंवा उपक्रमात गुरुकृपेने साधक जोडले जातात.

श्री. गुरुप्रसाद गौडा

२. एखाद्या सेवेचे उत्तरदायित्व दिल्यास आणि ते अचानक पालटल्यास साधकाच्या मनात प्रश्‍न निर्माण होणे अन् काही वेळा नकारात्मक विचार येणे

गुरुदेवांच्या कृपेने एखाद्या साधकाला एखाद्या सेवेचे उत्तरदायित्व मिळाले, तरी त्या साधकाने ती सेवा शिकून त्याला पुष्कळ अनुभव मिळण्यापूर्वीच त्याला दुसरी सेवा मिळते. त्या वेळी साधकाच्या मनात (सर्वसामान्यपणे) ‘माझे उत्तरदायित्व का पालटले ? मी सेवेच्या एका टप्प्याचा अनुभव घेत होतो, तर त्यात पालट का केला ?’, असे अनेक प्रश्‍न येतात. काही वेळा मनात नकारात्मक विचार घर करतात. ‘अशा प्रसंगात आपला दृष्टीकोन कसा असायला हवा ?’, हे माझ्या बुद्धीला समजले, त्याप्रमाणे व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे.

३. ‘साधनेचा पुढील टप्पा कोणत्या सेवेत आहे ?’, हे सर्वज्ञ गुरुदेवच जाणत असल्याने ते त्यांनाच ठाऊक असणे आणि आपण ते केवळ बुद्धीनेच ग्रहण करत असल्याने आपल्यात नकारात्मकता येणे

‘कोणत्या वेळी सेवा पालटली किंवा कशासाठी सेवा पालटली ?’, असा विचार न करता ‘माझ्या साधनेचा पुढील टप्पा कोणत्या सेवेत आहे ?’, हे सर्वज्ञ गुरुदेवच जाणतात आणि त्यांनाच ते ठाऊक असतेे’, हे जाणून ते स्वीकारायला हवे; मात्र आपण ते केवळ बुद्धीने ग्रहण करतो. त्यामुळे आपल्यात नकारात्मकता येते. त्याचप्रमाणे एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी, एका केंद्रातून दुसर्‍या केंद्रात, एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात, आणखी पुढचा टप्पा, म्हणजे एका राज्यातून दुसर्‍या राज्यात साधकांना सेवा मिळते. तेव्हाही साधकांच्या मनात अयोग्य किंवा नकारात्मक विचार येतात. काही वेळा त्याचा स्वीकार न झाल्याने त्यांची नकारात्मकताही वाढते.

४. प्रत्येकाचा स्वतःचा असा देवाण-घेवाण हिशोब वेगवेगळ्या व्यक्तींशी किंवा स्थळांशी संबधित असणे आणि तो हिशोब जाणणारे केवळ गुरुदेवच असणे

या संदर्भात एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे, ‘प्रत्येकाचा स्वतःचा असा देवाण-घेवाण हिशोब असतो. तो वेगवेगळ्या व्यक्तींशी किंवा स्थळांशी संबधित असतो. अनेक जन्म घेऊन वेगवेगळ्या व्यक्तींशी असलेला देवाण-घेवाण हिशोब फेडणे किंवा अनेक ठिकाणी जन्म घेऊन तिथला देवाण-घेवाण हिशोब पूर्ण करणे’, हे मनुष्य जन्मात अपेक्षित असते. हे सर्व जाणणारे केवळ गुरुदेवच आहेत. अनेक जन्मांमध्ये, अनेक ठिकाणी, अनेक व्यक्तींशी असलेला आपला देवाण-घेवाण हिशोब गुरुदेवांच्या कृपेमुळे याच जन्मात अनेक ठिकाणी जाऊन आणि अनेक सेवा मिळून तो फेडून घेण्याचा प्रयत्न होत असतो; परंतु आपण त्याचा बुद्धीने विचार करून अयोग्य आणि नकारात्मक विचार करतो. त्यामुळे गुरुदेवांना सेवेतील दायित्वाच्या अनुभवापेक्षा व्यापकता येणे अपेक्षित असल्याचे लक्षात येते.

५. गुरुदेवांच्या इच्छेने सर्व घडत असल्याने प्रत्येकाने सकारात्मकतेचा स्वीकार करून त्याप्रमाणे प्रयत्न करणे श्रीगुरूंना अपेक्षित असणे

‘आपल्या साधनेचा प्रत्येक टप्पा कसा असला पाहिजे ?’, हे ठरवणारे गुरुदेव आहेत. हात धरून पुढे चालवणारे गुरुदेवच !

आपल्या साधनेचा अधिकार सोडून गुरुदेव तो इतर कुणाला देणे शक्य आहे का ? प्रत्येकाने ‘गुरुदेवांच्या इच्छेने सर्व घडत आहे’, या सकारात्मकतेचा स्वीकार करून त्याप्रमाणे प्रयत्न करणे श्री गुरूंना अपेक्षित आहे.’

– श्री. गुरुप्रसाद गौडा, हुब्बळ्ळी (२७.५.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक