उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडून हिंदु जनसेवा समितीचा ‘कोरोना योद्धा’ म्हणून सन्मान

उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या हस्ते ‘कोरोना योद्धा’ सन्मान स्वीकारतांना समितीचे पदाधिकारी

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – कोरोना महामारीच्या बिकट परिस्थितीत ‘कोरोना योद्धा’ म्हणून कार्य करणार्‍या हिंदु जनसेवा समितीला उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. राजभवनाच्या सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमामध्ये राज्यपाल पटेल यांनी २१ स्वयंसेवी संस्थांना प्रशस्तीपत्रक वितरित केले. या वेळी त्या म्हणाल्या, ‘‘अशा समाजसेवी संस्था आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यामुळे राज्याला कठीण परिस्थितीत कोरोना महामारीशी सामना करता आला.’’

क्षयरोगाचे रुग्ण दत्तक घेण्याचा हिंदु जनसेवा समितीचा निर्णय

केंद्रसरकारची ‘क्षयरोगमुक्त भारत’ ही योजना वर्ष २०२५ पर्यंत पुढे नेण्यासाठी सामाजिक संस्थांनी योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी या वेळी केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हिंदु जनसेवा समितीने ७१ क्षयरोग पीडित रुग्णांना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. या वेळी समितीचे अध्यक्ष श्री. प्रज्वल गुप्ता, जिल्हाधिकारी अभिषेक प्रकाश आदी मान्यवर उपस्थित होते.