नोएडा (उत्तरप्रदेश) येथे दिवाळीनिमित्त ‘ऑनलाईन’ सत्संगाचे आयोजन

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा संयुक्त उपक्रम

नोएडा (उत्तरप्रदेश) – दिवाळीच्या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने एका ‘ऑनलाईन’ सत्संगाचे आयोजन करण्यात आले. या सत्संगाला सनातनच्या कु. पूनम चौधरी आणि सौ. राजरानी माहूर यांनी मार्गदर्शन केले.

या वेळी कु. पूनम चौधरी यांनी दिवाळीच्या वसुबारस, नरक चतुर्दशी, बलीप्रतिपदा, यमदीपदान या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व विशद केले. सौ. राजरानी माहूर यांनी कोरोनाच्या काळामध्ये दिवाळी कशी साजरी करावी, याविषयी मार्गदर्शन केले. तसेच दिवाळीला लक्ष्मीदेवीचे चित्र असलेले फटाके फोडू नये आणि लक्ष्मी चित्रपटातील हिंदु देवदेवतांचे विडंबन रोखावे, यांविषयी उपस्थितांचे प्रबोधन केले. या मार्गदर्शनाचा अनेक जिज्ञासूंनी लाभ घेतला.