कुलभूषण जाधव यांचे अपहरण करून पाक सैन्याकडे देणारा आतंकवादी मुल्ला ओमर याला पाक सैन्यानेच केले ठार !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या बलुचिस्तानच्या तुर्बत भागात पाकच्या सैन्याने मुल्ला ओमर या जिहादी आतंकवाद्याला आणि त्याच्या मुलाला ठार केले. मुल्ला ओमर लष्कर-ए-तोयबा, लष्कर-ए-कुरूसन आणि जैश-उल-आदल या आतंकवादी संघटनांना साहाय्य करत होता.

मुल्ला ओमर यानेच भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांचे अपहरण करून त्यांना पाक सैन्याकडे सोपवले होते. तरीही पाकने ओमर याला ठार का मारले, हे समजू शकलेले नाही.