
सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाचे पुरस्कार २४ डिसेंबरला घोषित करण्यात आले. यामध्ये आदर्श पत्रकार पुरस्कार दैनिक तरुण भारतचे जिल्हा मुख्यालय प्रतिनिधी संदीप गावडे यांना, उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार दैनिक सकाळचे वेंगुर्ला प्रतिनिधी दीपेश परब यांना, ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार दैनिक तरुण भारतचे आरोंदा येथील पत्रकार महादेव परांजपे यांना, ग्रामीण भागासाठी दिला जाणारा आदर्श पत्रकार पुरस्कार लोकमतचे शिरगाव येथील प्रतिनिधी दिनेश साटम यांना आणि उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार कणकवली येथील अनिकेत उचले यांना घोषित झाला आहे. कै. अरविंद शिरसाट यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ यावर्षी दोडामार्गमधील तेजस देसाई यांना जिल्हा पत्रकार संघाचा पुरस्कार घोषित झाला आहे.
जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, सचिव उमेश तोरस्कर यांनी २४ डिसेंबरला झालेल्या जिल्हा पत्रकार संघ कार्यकारिणीच्या बैठकीनंतर या पुरस्कारांची घोषणा केली. ६ जानेवारी २०२१ या दिवशी पत्रकारदिन समारंभात ओरोस येथे मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
दादर येथे बेस्ट बसचा अपघात : दोघांचा मृत्यू, तर १३ जण घायाळ
तरुणांकडून रिक्शाचालकाला मारहाण !
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळांमधून होणारी विद्यार्थ्यांची लूट तात्काळ थांबवा !
हिंदूंनो धर्माभिमान जागृत करून धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हा ! – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती
भ्रमणभाषच्या जगात वावरतांना श्रीकृष्णाचे स्मरण ठेवा – ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास
सत्संगात नसलेल्यांची स्थिती भरकटलेल्या पतंगासारखीच – ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास