
पणजी, २४ डिसेंबर (वार्ता.) – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपशी युती करण्याची शक्यता महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे अध्यक्ष श्री. दीपक ढवळीकर यांनी नाकारली आहे. मगो पक्षाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ‘‘वर्ष २०२२ मध्ये होणार्या निवडणुकीत मगो पक्ष भाजपशी युती करण्याची शक्यता मुळीच नाही. जर वेळ आली, तर आम्ही इतर समविचारी विरोधी पक्षांशी युती करू; परंतु भाजपशी नाही. २०२२ ची विधानसभा निवडणूक आम्ही पूर्ण ताकदीने लढवणार आहोत. भाजपचे काही नेते आणि मगो पक्षाच्या विरोधातील इतर काही लोक ‘मगो पक्षात फूट पडली आहे’, असे चित्र उभे करत आहेत. मगो पक्षामध्ये कोणत्याही प्रकारची फूट नसून पक्षाची चुकीची प्रतिमा उभी केली जात आहे. आम्ही संघटितपणे काम करत असून पक्षाचे निर्णय सर्वांना विश्वासात घेऊन घेतले जातात. सध्याचा सत्ताधारी पक्ष अन्यायाने वागत आहे. वर्ष २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत मगो पक्षाने ३ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर ३ पैकी २ आमदारांनी पक्षत्याग करून भाजपमध्ये प्रवेश केला. गोवा विधानसभेचे सभापती मगो पक्ष सोडून गेलेल्या २ आमदारांच्या अपात्रता याचिकेवर विचार करत नाहीत.’’ या वेळी कोणत्या विरोधी पक्षाशी मगो पक्ष युती करणार, हे सांगण्यास श्री. दीपक ढवळीकर यांनी नकार दिला.
धर्मांतरितांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्यायच्या का ?, हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
(म्हणे) ‘हिंदी आणि उर्दू भारताच्या भाषा, तर संस्कृत बाहेरून आली !’ – Congress MP Mohammad Javed
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)