प्रामाणिक राजकारणी आर्डन !

भारतात सत्तरी, पंचाहत्तरी, हेच कशाला, ८० वर्षे गाठलेले राजकारणी अजूनही राजकारणात सक्रीय आहेत. ‘अशांचे समाजाला योगदान किती ?’, हे पडताळण्‍याची वेळ आता आली आहे. आर्डन यांनी ‘खरा नेता तो, ज्‍याला पद सोडण्‍याची वेळ ठाऊक असते’, असे म्‍हटले होते. त्‍याचे चिंतन भारतीय राजकारण्‍यांनी करणे आवश्‍यक आहे.

‘रेन्‍बो’चे मृगजळ !

ब्रिटनमध्‍ये मूळ धरू लागलेल्‍या ‘रेन्‍बो’ प्रथेचे भारतीय संस्‍कृतीशी साधर्म्‍य असले, तरी दृष्‍टीकोनापासून आचरणापर्यंत भारतीय संस्‍कृतीचे श्रेष्‍ठत्‍व, तर ‘रेन्‍बो’ प्रथेची उथळता पावलोपावली जाणवल्‍याविना रहात नाही ! समाजात खरा एकोपा निर्माण करायचा असेल, तर हिंदु संस्‍कृतीचा अवलंब करण्‍याविना पर्याय नाही !

राष्‍ट्रीय सामंजस्‍य हवे !

म्‍हादईचे पाणी गोवा राज्‍याला मिळावे, याचा अर्थ कर्नाटक राज्‍यातील जनतेचे पाण्‍याविना हाल व्‍हावेत, असे कोणत्‍याही गोमंतकियाला वाटणार नाही. केंद्रशासनाने त्‍यांना अवश्‍य साहाय्‍य करावे; परंतु गोमंतकातील मानवजात आणि येथील सामाजिक जीवनाचा आत्‍माच असलेले जैववैविध्‍य अबाधित रहाण्‍यासाठी कठोर भूमिका घेण्‍यातच भले आहे !

कारागृहांतील ‘नेटवर्क’ !

आज रुग्‍णालयांमध्‍ये रुग्‍णांची लूट केली जाते, अधिवक्‍ते खोट्याचे खरे करतात, अभियंते पडणार्‍या इमारती बांधतात आणि शासनकर्ते जनतेला लुबाडतात, हे लक्षात घ्‍यायला हवे ! त्‍यामुळे प्रथम पालकांनी साधना करून धर्माचरण केले पाहिजे आणि पाल्‍यांवर तसे संस्‍कार केले, तर राजा अन् प्रजा दोन्‍ही नीतीमान होतील !

‘सेतूसमुद्रम्’ प्रकल्‍प रोखा !

‘केंद्रशासनाने रामसेतूला राष्‍ट्रीय स्‍मारक घोषित करण्यास विलंब केला, तर ज्‍याप्रमाणे राममंदिराच्‍या बांधकामासाठी हिंदूंना रस्‍त्‍यावर उतरावे लागले होते, तोच भाग रामभक्‍तांंना येथेही करावा लागेल. असे होण्‍यापेक्षा केंद्राने रामसेतूला हानी पोचवू शकणार्‍या या प्रकल्‍पालाच पूर्णविराम देऊन हिंदूंच्‍या धर्मश्रद्धा जपाव्‍यात, हीच अपेक्षा !

हिंदू अल्पसंख्यांक म्हणजे भारत गमावणे !

देशाची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली. त्यापूर्वी भारतापासून विभाजित होऊन जे स्वतंत्र देश झाले. यांतील एकही देश हिंदूंचा राहिलेला नाही. त्यामुळे हिंदूंनी अल्पसंख्यांक होणे म्हणजे काय ? याचे उत्तर ‘भारत गमावणे’, हेच आहे. त्यामुळे अल्पसंख्यांक व्हायचे ? कि वैभवशाली भारताची निर्मिती करायची ? हे हिंदूंनी ठरवावे.

धर्मग्रंथद्वेष आणि वास्‍तव !

वर्ष २०२२ मधील गुढीपाडव्‍याला हिंदु धर्माच्‍या कालगणनेनुसार १५ निखर्व, ५५ खर्व, २१ अब्‍ज, ९६ कोटी ८ लाख ५३ सहस्र १२४ व्‍या वर्षाचा आरंभ झाला. ही वर्षे मोजणेही एखाद्या विज्ञानवाद्याला अशक्‍यप्राय असेल. हिंदु संस्‍कृती इतकी प्राचीन असतांना हिंदूंचे धर्मग्रंथ अश्‍लील कसे ठरू शकतात ?

बिहारमधील रावणराज !

अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्याच्‍या नावाखाली जर कुणी हिंदूंचे आदर्श पुरुष आणि ग्रंथ यांच्‍यावर खालच्‍या थराला जाऊन टीका करणार असतील, तर केंद्र सरकारनेही कठोर भूमिका घेत योग्‍य ती कायदेशीर कारवाई करण्‍यासाठी पावले उचलली पाहिजेत, म्‍हणजे परत कुणी अशी वक्‍तव्‍ये करण्‍याचे धाडस करणार नाही.

बिहारच्‍या जातीगणनेचे गाजर !

बहुतांश राजकीय पक्ष ‘यापूर्वीच्‍या व्‍यवस्‍थेमुळे समान न्‍याय मिळाला नाही आणि आम्‍हीच यांचे कसे खरे कैवारी आहोत’, असे भासवण्‍याचा प्रयत्न करतात. प्रत्‍यक्षात मात्र प्रत्‍येक गोष्‍टीतून राजकीय लाभ कसा होईल ?, याच्‍याशीच त्‍यांचा स्‍वार्थ जोडलेला असतो.

नेमेचि होते आरडाओरड !

भ्रष्‍टाचाराच्‍या प्रकरणांचे खटले जलद गती न्‍यायालयात चालवून भ्रष्‍टाचार्‍यांना कठोर शासन झाले पाहिजे. तरच भ्रष्‍टाचार करणार्‍यांना चाप बसेल आणि मग त्‍यांच्‍या समर्थनार्थ कुणाला आरडाओरड करण्‍याची सोयच उरणार नाही ! भ्रष्‍टाचार्‍यांसह त्‍यांचे समर्थन करणार्‍यांवरही सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !