Army Dog Phantom Martyred : काश्मीरमध्ये आतंकवाद्यांशी लढतांना भारतीय सैन्याच्या श्‍वानाला वीरमरण

मागच्या वर्षांपासून आतंकवाद्यांशी लढतांना वीरगतीला प्राप्त होणारा फँटम हा दुसरा श्‍वान आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये लॅब्राडोर जातीची मादी श्‍वान ‘केंट’ हिचा राजौरी जिल्ह्यात चकमकीत मृत्यू झाला होता.

Karnataka Waqf Property : कर्नाटकातील १ सहस्र २०० एकर भूमीवरील वक्फचा दावा काँग्रेस सरकारने घेतला मागे !

शेतकर्‍यांनी याला विरोध केला नसता, तर ही भूमी वक्फ बोर्डाच्या घशात गेली असती ! त्यामुळे केंद्र सरकारने वक्फ कायद्यात सुधारणा करण्यापेक्षा तो रहित करणेच आवश्यक !

Islamic NATO : पाकिस्तानसह २० हून अधिक इस्लामी देश स्वतंत्र सैन्यसंघटना स्थापन करणार !

या संघटनेला प्रथम तिच्याच सदस्य देशांविरुद्ध कारवाई करावी लागेल ! तसे ती कधीही करणार नाही; म्हणूनच ही सैन्यसंघटना स्थापन करण्याची घोषणा, म्हणजे निव्वळ फार्सच ठरणार आहे !

उत्तराखंड राज्यात अहिंदूंच्या प्रवेशावर बंदी घालण्यासाठी कायदा करा ! – Swami Anand Swaroop

परिस्थिती गंभीर आहे. राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार असल्याने या प्रकरणी गांभीर्याने योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, अन्यथा हिंदूंच्या धार्मिक स्थळी बांगलादेशासारखी स्थिती निर्माण होऊ शकते !

विरोध असूनही हणजूण कोमुनिदादची ३ मोठ्या कार्यक्रमांना मान्यता

स्थानिकांचा विरोध असूनही हणजूण कोमुनिदादच्या २७ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या सर्वसाधारण सभेत कोमुनिदाद भूमीत ३ मोठ्या ‘इव्हेंट’चे (कार्यकमांचे) आयोजन करण्यास मान्यता देण्यात आली.

पैंगीण निवासी दत्तानुभव उपाख्य राघव गुलाब टेंग्से यांना ‘वेदांतरत्न’ उपाधी प्राप्त !

येथील टेंग्से कुलोत्पन्न तर्करत्न श्री. दत्तानुभव उपाख्य राघव गुलाब टेंग्से यांनी वेदांत शास्त्रामध्ये संपूर्ण अद्वैतवेदांत शास्त्राची ‘तेनाली’ येथे महापरीक्षा देऊन २७ ऑक्टोबर या दिवशी ‘वेदांतरत्न’ ही उपाधी कांची पीठाचे शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती यांच्याकडून प्राप्त केली.

वसुबारसच्या दिवशी हिंदुत्वनिष्ठांनी तिलारी घाटात गोमांसाची अवैध वाहतूक रोखली !

जे हिंदुत्वनिष्ठांच्या निदर्शनास येते, ते सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास का येत नाही ?

२ जणांना पैसे घेऊन नोकर्‍या देण्यात गोवा सचिवालयातील २ शासकीय अधिकार्‍यांचा सहभाग! – मुख्यमंत्री

पूजा सावंत यांनी सरकारी नोकरीचे आमीष दाखवून फसवल्याचे प्रकरण

कुणकेश्वर येथील समुद्रात खलाशाची हत्या करून मासेमारी नौकेला लावली आग : एक जण पोलिसांच्या कह्यात

राजीवाडा, रत्नागिरी येथील अरफत हमीद फणसोपकर यांच्या मालकीच्या यांत्रिक मासेमारी नौकेवर काम करणार्‍या एका खलाशाने त्याच्या सहकार्‍याची हत्या केली आणि त्यानंतर नौकेला आग लावली.

अज्ञातांकडून कोल्हापूर येथे काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक !

कोल्हापूर उत्तर भाग विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत कोल्हापूर उत्तर मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. नाव घोषित होताच अज्ञातांकडून काँग्रेसच्या कार्यालयावर कार्यालयावर दगडफेक करण्यात आली.