पणजी, २८ ऑक्टोबर (वार्ता.) – वसुबारसच्या दिवशी हिंदुत्वनिष्ठांनी तिलारी घाटावर गोमांसाची अवैध वाहतूक रोखली. गोमांस भरलेला ट्रक कर्नाटक येथून कळंगुट येथे जात होता.
शुद्ध भाजीपाला हिंदु विक्रेत्यांकडून घेण्याचे आवाहन
‘केए २२, डी ६३२७’ या क्रमांकाच्या ट्रकमधून ही वाहतूक करण्यात येत होती. याविषयी अधिक माहिती देतांना वाहन अडवलेले हिंदुत्वनिष्ठ म्हणाले, ‘‘वाहनात गोमांसावर भाजीपाला ठेवण्यात आला होता. यामुळे भाजीपाल्याला गोमांसाचे रक्त लागण्याची शक्यता आहे. शाकाहारी हिंदूंच्या धर्मभावना दुखावणारी ही गोष्ट आहे. त्यामुळे यापुढे प्रत्येक हिंदूने भाजीपाला खरेदी करतांना ती हिंदु बांधवांकडूनच खरेदी करावा आणि स्वतःची होणारी फसवणूक टाळावी.’’
‘तिलारी घाट सध्या अवजड वाहनांसाठी बंद असल्याने एस्.टी. बसची वाहतूकही यामार्गे बंद आहे. असे असतांना या मार्गावरून अशा अवजड वाहनांची वाहतूक होते कशी ?’, असा प्रश्न निर्माण होत आहे.
तिलारी घाटातून २१ जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीसाठी अवजड वाहनांसह एस्.टी.च्या वाहतुकीला बंदी घालण्याचा आदेश कोल्हापूर जिल्हाधिकार्यांनी पारित केला आहे; मात्र या मार्गावरून ट्रकमधून गोमांसाची वाहतूक झाल्याचे आढळल्याने पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभाग (आर्.टी.ओ.) या विभागांनी या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचे या प्रकारावरून स्पष्ट होते.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत असलेली एस्.टी.ची सेवा या घाटातून चालू करून सर्वसामान्य जनतेची सोय करावी, यासाठी अनेक आंदोलने करण्यात आली; मात्र त्याला अद्याप अनुमती देण्यात आलेली नाही; मग ट्रकची वाहतूक या घाटातून कशी होते ? असा प्रश्न गोरक्षकांनी उपस्थित केला आहे.
गोमांस असल्याची माहिती सर्वत्र पसरल्यानंतर विविध संघटनांचे कार्यकर्ते तेथे उपस्थित झाले. त्यानंतर पोलीसही तेथे आले. या वेळी संतप्त कार्यकर्त्यांनी ‘घाटाच्या प्रारंभी पोलीस तैनात असतांना घाटातून अवजड वाहने कशी येतात ?’, असा प्रश्न पोलिसांना विचारत पोलीस प्रशासनाच्या विरोधात अप्रसन्नता व्यक्त केली.
संपादकीय भूमिकाजे हिंदुत्वनिष्ठांच्या निदर्शनास येते, ते सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास का येत नाही ? |