आज कोल्हापुरात दुर्ग परिषद ! – सुखदेव गिरी

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने किल्ले रायगडनंतर होणार्‍या या परिषदेत दुर्ग अभ्यासकांनी केलेले काम, विविध माहितीचे संकलन, दुर्लक्षित गडांविषयीची माहिती आदींविषयी ऊहापोह होणार आहे.

काँग्रेस हा गोंधळलेला पक्ष ! – पंतप्रधान मोदी

मोदी म्हणाले की, यूपीएच्या शासनकाळात ‘ए.पी.एम्.सी.’ कायद्यात पालट सुचवणारे तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे आज त्याचा आधार घेऊन बनवण्यात आलेल्या कृषी कायद्यांचा विरोध करत आहेत.

पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या संस्थेला करवसुलीसाठी पाठवलेल्या नोटिसीला स्थगिती

श्रीमंत, मध्यमवर्गीय किंवा सामाजिक संस्था कोणीही कर चुकवला तरी चूकच नव्हे का ?

आमदार-खासदारांच्या संस्थाच जिल्हा बँकेचे मोठे थकबाकीदार

जिल्हा बँकेची थकबाकी वाढतच असून आमदार-खासदारांच्या संस्थांकडे अनुमाने १ सहस्र कोटींची कर्जे आणि थकबाकी आहे. हा आकडा वाढत असतांना कारभार्‍यांनी वसुलीकडे कानाडोळा केला आहे.

मुंबईत आधुनिक वैद्यांचे अपहरण करणार्‍या टोळीला अटक

इतक्या मोठ्या प्रमाणावर गंभीर गुन्हे नोंद असूनही गुंड आणखी गुन्हे करण्यासाठी मोकाट फिरत असणे, हे कायदा आणि सुव्यवस्था यांच्या अपयशाचे द्योतक आहे, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?

घोटी (नांदेड) येथील जिल्हा परिषदेची शाळा अज्ञातांकडून जे.सी.बी.ने भुईसपाट !

रात्रीच्या वेळी केलेले हे कृत्य नक्कीच मोठा संशय निर्माण करणारे आहे. शासनाच्या शाळेची इमारत पाडण्याचे धैर्य करणार्‍या म्हणजे शासनाच्या विरोधात जाणार्‍या या सूत्रधारांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी !

कोरोना योद्ध्यांचे अपघाती विमा प्रस्ताव मनपा प्रशासनाने नाकारले

कठीण काळात जिवाची पर्वा न करता सेवेत प्राण गमावणार्‍या कर्मचार्‍यांच्या वारसांनी काय करावे ? किरकोळ कारणे देऊन कर्मचार्‍यांचे प्रस्ताव नाकारणार्‍या प्रशासनाला कर्मचार्‍यांकडून पैशांची अपेक्षा आहे, असे कुणाला वाटले, तर चूक ते काय ?

सर्व शाळा-महाविद्यालयांत हिंदु जनजागृती समितीच्या निवेदनाचा विषय पोचवतो ! – शिक्षणाधिकारी आर्.डी. शिंदे, जत

आपली महान भारतीय संस्कृती बाजूला ठेवून भारतीय अकारण पाश्‍चिमात्य संस्कृतीचे आचरण करत आहेत. तुमचा उपक्रम चांगला असून सर्व शाळा-महाविद्यालये येथे विषय पोचवतो, असे आश्‍वासन शिक्षणाधिकारी आर्.डी. शिंदे यांनी दिले.

मकर राशीतील ७ ग्रहांच्या मिलनामुळे भारतात तणावपूर्ण परिस्थिती बनू शकते ! – ज्योतिषांचा दावा

९ फेब्रुवारीच्या रात्री ८ वाजून ३१ मिनिटांनी चंद्राने मकर राशीत प्रवेश केला आहे. या परिस्थितीत भारतात तणावपूर्ण परिस्थिती बनू शकते. राजकीय गोंधळदेखील पहायला मिळू शकतो. अपघातांची संख्या आणि महागाई वाढू शकते.

केरळमध्ये सत्तेत आलो, तर लव्ह जिहादविरोधी कायदा बनवू ! – भाजप

भाजप केंद्रात सत्तेत आहे, तर त्याने संपूर्ण देशासाठीच असा कायदा बनवावा, असेच हिंदूंना वाटते !