केरळमध्ये सत्तेत आलो, तर लव्ह जिहादविरोधी कायदा बनवू ! – भाजप

भाजप केंद्रात सत्तेत आहे, तर त्याने संपूर्ण देशासाठीच असा कायदा बनवावा, असेच हिंदूंना वाटते !

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळमध्ये भाजपप्रणीत लोकशाही आघाडीची सत्ता आली, तर उत्तरप्रदेश सरकारने बनवला आहे, तसा लव्ह जिहादविरोधी कायदा बनवण्यात येईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन् यांनी म्हटले आहे.

केरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन्

सुरेंद्रन् म्हणाले की, लव्ह जिहाद एक चिंतेचा विषय आहे. केवळ हिंदुत्वनिष्ठ संघटनांच नव्हे, तर ख्रिस्ती संघटना आणि चर्च यांच्याकडूनही कायदा बनवण्याची मागणी केली जात आहे. आम्ही येत्या विधानसभा निवडणुकीच्या घोषणापत्रात कायदा बनवण्याचे आश्‍वासन देणार आहोत.