कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर कार्निव्हलचे आयोजन करण्यास नेते आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा विरोध

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर कार्निव्हलचे आयोजन करू नये आणि हा निर्णय धोकादायक ठरू शकतो. हा कार्निव्हल पर्यटकांसाठी आयोजित केला जातो.

११ फेब्रुवारीपासून दादर-म्हैसुरू साप्ताहिक एक्सप्रेस चालू

दादर-म्हैसुरू साप्ताहिक एक्सप्रेस ११ फेब्रुवारीपासून दादर येथून, तर १४ फेब्रुवारीपासून म्हैसुरू येथून चालू होणार आहे, असे मध्य रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले आहे. रेल्वे मंत्रालयाकडून उत्तर आणि दक्षिण भारतात टप्प्याटप्प्याने रेल्वे वाहतूक चालू करण्यात येत आहे.

फुटीर १२ आमदारांच्या अपात्रता याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने मार्चपर्यंत पुढे ढकलली

भाजपात प्रवेश केलेले काँग्रेसचे १० आणि मगोपचे २ आमदार यांच्या विरोधात प्रविष्ट करण्यात आलेल्या अपात्रता याचिकांवर गोवा विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर २६ फेब्रुवारी या दिवशी सुनावणी घेणार आहेत.

काजूला योग्य मूल्य न मिळाल्यास शेतकरीच काजू खरेदी करणारा शोधणार !

योग्य भाव न मिळाल्यास शेतकरी चांगले मूल्य देणारा खरेदीदार (काजू खरेदी करणारा व्यापारी) शोधून त्याला काजू विक्री करतील.

मालवण पंचायत समिती राबवणार ‘ऐतिहासिक स्थळांवर स्वच्छता मोहीम’ हा अभिनव उपक्रम

ऐतिहासिक स्थळांवर स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय घेणार्‍या मालवण पंचायत समितीचे अभिनंदन !

वर्ष २०२० मध्ये भारत-बांगलादेश सीमेवर घुसखोरीच्या ४८९ घटना !

ही संख्या शून्य होणे हीच स्थिती खर्‍या अर्थाने सीमा सुरक्षित असल्याचे दर्शक ठरील !

वरिष्ठ अधिकार्‍यांवर कारवाईच्या इशार्‍यानंतर ट्विटरकडून भारतविरोधी ७०९ खाती बंद

सरकारने आता ‘अ‍ॅमेझॉन’ आदींसारख्या विदेशी आस्थापनांचे तोंड दाबून त्यावरून होणारा हिंदूंच्या देवतांचा अवमान रोखण्याचा प्रयत्न करावा, !

आतापर्यंत राज्यातील ५ लाखांहून अधिक व्यक्तींना कोरोनावरील लस देण्यात आली ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

राज्यात प्राधान्यक्रम ठरलेल्या व्यक्तींना कोरोनावरील लस देण्याची प्रक्रिया चालू आहे. ६५२ केंद्रांवर ही लस दिली जात आहे.

कटाच्या बैठकीला उपस्थित रहाण्यासाठी सैन्याने अनुमती दिली असल्याविषयी न्यायालयाने ले. कर्नल पुरोहित यांच्याकडे मागितले पुरावे

मालेगाव येथे बॉम्बस्फोटाच्या कटाच्या बैठकीला सैन्याच्या आदेशावरून गुप्तवार्ता मिळवण्यासाठी उपस्थित असल्याची स्वत:ची बाजू कर्नल पुरोहित यांनी न्यायालयात मांडली आहे.

देहलीतील शेतकर्‍यांना चर्चा नाही, तर तमाशा करण्यातच रस ! – पाशा पटेल

सरकार सर्व मागण्यांवर चर्चा करायला सिद्ध असतांना शेतकर्‍यांनी आडमुठे धोरण ठेवले आहे. त्यांना प्रश्‍न सोडवून घ्यायचे नाहीत, त्यांना तमाशा करण्यात रस आहे, अशी टीका राज्य कृषीमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केली.