देहली – शेतकर्यांच्या आंदोलनाला मी पवित्र मानतो; परंतु त्यामध्ये घुसलेल्या सांप्रदायिक आणि ‘आतंकवाद्यांना मुक्त करा’, अशी मागणी करणार्यांमुळे ते आंदोलन अपवित्र झाले आहे. काँग्रेसने नव्या कृषी कायद्यांवर घेतलेली वेगवेगळी भूमिका त्या पक्षाचा गोंधळ स्पष्ट करते.
PM Modi says Congress is divided and confused party, Congress MPs stage a walkout from Lok Sabha when PM starts talking about farm lawshttps://t.co/Jvb0zo8VAi
— OpIndia.com (@OpIndia_com) February 10, 2021
त्यांची लोकसभेत एक भूमिका आहे, तर राज्यसभेत वेगळीच भूमिका आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सायंकाळी लोकसभेत केलेल्या भाषणात केले. मोदी पुढे म्हणाले की, यूपीएच्या शासनकाळात ‘ए.पी.एम्.सी.’ कायद्यात पालट सुचवणारे तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे आज त्याचा आधार घेऊन बनवण्यात आलेल्या कृषी कायद्यांचा विरोध करत आहेत. शेतकर्यांमध्ये भ्रम निर्माण करण्यासाठी हा रस्ता निवडण्याची शंका येते. मोदी यांच्या भाषणाच्या वेळी काँग्रेसच्या खासदारांनी सभात्याग केला.