भाजपचे नगरसेवक दया शंकर यांची नागपूर येथील महापौरपदी वर्णी

नागपूर शहराचे नवे महापौर म्हणून भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दया शंकर तिवारी असणार आहेत.

पुण्यात पुन्हा गव्याचे आगमन !

बावधन परिसरात बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगत केंद्र सरकारच्या ‘हाय एनर्जी मटेरियल लॅबोरेटरी’चे (‘एच्.इ.एम्.आर्.एल्.’) कंपाऊंड वॉल आणि महामार्ग यांच्या मध्ये असलेल्या झाडीमधे गवा आढळून आला आहे.

जमावबंदी असतांना मिरवणूक काढल्याने सातारा येथील भाजप सरपंचांसह ५२ जणांवर गुन्हा नोंद

सरपंचच नियमांचे पालन करत नसतील, तर ते समाजाकडून नियमांचे पालन कसे करून घेतील ? नियम मोडणारे नाही, तर नियमांचे पालन करणारेच लोकप्रतिनिधी हवेत !

वणी (यवतमाळ) येथील भालर शिवारात वाघांची दहशत

प्रशासनाने तातडीने उपाययोजना काढून गावकर्‍यांना वाघांच्या दहशतीपासून मुक्त करावे !

जळगाव एम्.आय.डी.सी. पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक लाच स्वीकारतांना कह्यात

सरकारी कर्मचार्‍यांमधील लाचखोरीचे वाढते प्रमाण निंदनीय ! असे भ्रष्ट पोलीस जनतेचे रक्षक कि भक्षक ?

किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी असणारी अफझलखान आणि सय्यद बंडा यांची कबर परिसर शिवभक्तांना पहाण्यासाठी खुला करावी ! – श्री शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलनाची निवेदनाद्वारे मागणी

शिवप्रतापामुळे आजच्या युवकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा, हुशारी आणि युद्धनीती यांचीही जाणीव होते. त्यामुळे हा परिसर तात्काळ खुला करण्याची आवश्यकता आहे.

शिवप्रतापदिनाच्या निमित्ताने ठिकाठिकाणी शिवप्रतापाचा जागर !

मार्गशीर्ष शुक्ल पक्ष ७ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानाचा वध केला. याला २१ डिसेंबर या दिवशी ३५२ वर्षे पूर्ण झाली. हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून ओळखला जातो. या दिनाच्या निमित्ताने शिवप्रेमींनी ठिकठिकाणी शिवप्रतापाचा जागर केला.

बजरंग सेनेचे अध्यक्ष पितांबर जाधव यांच्यावर पुन्हा आक्रमण

हिंदुत्वनिष्ठांवर सातत्याने आक्रमण करण्याची मुजोरी धर्मांधांनी करणे, हा गेल्या ७३ वर्षांत शासकीय स्तरावरून केल्या जाणार्‍या लांगूलचालनाचा परिणाम आहे. अशा प्रकारे हिंदुत्वनिष्ठांवर सातत्याने आक्रमण होणे, ही पोलिसांसाठीही लाजीरवाणी गोष्ट आहे !

वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते (बाबा) यांचा देहत्याग

हिंदु धर्माची बाजू परखडपणे मांडणारे, तसेच हिंदु धर्मावरील आघातांचे वेळोवेळी खंडण करणारे, सनातन संस्थेवर पित्याप्रमाणे प्रेम करणारे वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते (बाबा) यांनी त्यांच्या टाकळी या गावी देहत्याग केला.

(म्हणे) ‘मोदी त्यांच्या पत्नीसमवेत ५ दिवसही राहिले नसल्याने ते देशावर शासन करण्यास असमर्थ !’ – तमिळनाडूतील ख्रिस्ती बिशप एजरा सरगुनम यांची अश्‍लाघ्य टीका

असे पाद्री चर्चमध्ये असतील, तर ते समाजाला कशा प्रकारचे मार्गदर्शन करत असतील, हे लक्षात येते ! याविषयी तथाकथित निधर्मीवादी तोंड उघडतील का ?