पुणे – कोरोना काळात औद्योगिक क्षेत्राला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. औद्योगिक क्षेत्र बंद असतांना राज्य सरकारने उद्योगांकडून पाणीपट्टी तसेच विजेचा वापर झाला नसतांनाही वीजदेयक सक्तीने वसूल केले. केंद्र सरकारने उद्योगांना मदत केली असली तरी राज्य सरकारने मात्र कोणतीही मदत केली नाही असे सांगत आता ही दोन्ही देयके राज्य सरकारने माफ करावी. तसेच उद्योगांसाठी अंदाजे ८ सहस्र कोटी रुपयांचे पॅकेज द्यावे, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. मनोहर मंगल कार्यालय येथे भाजपच्या उद्योग आघाडीच्या कार्यकारिणीच्या झालेल्या बैठकीत ते बोलत होते.