|

अंकारा (तुर्कस्तान) – पाकच्या साहाय्यासाठी तुर्कस्तान काश्मीरमध्ये भाडोत्री जिहादी आतंकवादी पाठवून तेथे हिंसाचार करण्याचा प्रयत्न करणार आहे, असे वृत्त ग्रीसच्या ‘पेंटापोस्टाग्मा’ या वृत्तसंकेतस्थळाने दिले आहे. तुर्कस्तानला मध्य आशियात प्रमुख राष्ट्र म्हणून उदयास यायचे आहे. त्यामुळे तो पाकला साहाय्य करत आहे.
१. या वृत्तसंकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार तुर्कस्तानची भाडोत्री सैनिक संघटना असलेल्या ‘सादात’ हिला काश्मीरमध्ये सक्रीय करण्याची सिद्धता केली जात आहे.
२. ‘सादात’चे नेतृत्व तुर्कस्तानचे राष्ट्रपती रेचप एर्दोगन यांचे सैन्य सल्लागार अदनान तनरिवर्दी करतात. काश्मीरमध्ये तळ उभारण्यासाठी सय्यद गुलाम नबी फई या आतंकवाद्याची नियुक्ती करण्यात आली आहे. फई पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.च्या आर्थिक पाठबळावर आतंकवाद्यांची भरती करणे आणि करचोरी या प्रकरणांत अमेरिकेच्या कारागृहात २ वर्षांची शिक्षा भोगून आला आहे.
३. सय्यद गुलाम नबी फई याचा जन्म जम्मू-काश्मीरमध्ये झाला होता. तो जिहासी संघटना जमात-ए-इस्लामीचादेखील सक्रीय सदस्य आहे. फई याने काश्मीरमध्ये हिंसाचाराचा कट रचण्यासाठी अमेरिकेमध्ये ‘अमेरिकी कौन्सिल ऑफ काश्मीर’ची स्थापना केली होती. या संस्थेला आय.एस्.आय.कडून निधी दिला जातो. याची पुष्टी अमेरिकेची अन्वेषण यंत्रणा एफ्.बी.आय.ने केली होती.
इस्लामी सेना उभारण्याच्या प्रयत्नात असलेली ‘सादात’ !
अशा इस्लामी सेनेला सामोरे जाण्यासाठी भारतातील हिंदू सिद्ध आहेत का ?येणारा काळ ‘काफीर’ हिंदूंसाठी किती भयावह आहे, हे यातून दिसून येते !
‘सादात’ भाडोत्री आतंकवाद्यांचा गट आहे. तुर्कस्तान, सीरिया, लिबिया यांसह अनेक देशांतील आतंकवाद्यांना प्रशिक्षित करणे आणि शस्त्रांची रसद पुरवण्याचे काम हा गट करतो. यामध्ये मोठ्या संख्येने तुर्कस्तानचे निवृत्त सैनिकही सहभागी आहेत. ‘सादात’कडून इस्लामी देशातील सहस्रो आतंकवाद्यांना एकत्रित करून ‘इस्लामी सेना’ बनवण्याचा प्रयत्न चालू आहेत.
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन करणार्यांवर पाक सैन्याचा गोळीबार : १२ जण ठार, ३८ जर घायाळ
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी