उत्तर कोरियामध्ये घरामध्ये अश्‍लील चित्रपट पहाणार्‍या मुलामुळे संपूर्ण कुटुंबाला तडीपाराची शिक्षा !

भारतात अशा प्रकारच्या कठोर शिक्षा होत नसल्यानेच अश्‍लीलतेचे प्रमाण वाढत आहे, हे लक्षात घ्या !

वीजदेयक थकवल्यामुळे सातारा येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची वीजजोडणी तोडली

८५ सहस्र रुपयांचे वीजदेयक थकवल्यामुळे सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची वीजजोडणी वीज वितरणच्या कर्मचार्‍यांनी तोडली. सातारा जिल्ह्यातील प्रशासकीय कार्यालयावरील ही पहिलीच कारवाई आहे.

१ वर्षानंतर सातार्‍यातील राजवाडा येथील चौपाटी चालू होणार

या चौपाटीमुळे अनेक कुटुंबांचा चरितार्थ चालत होता. त्यामुळे या कुटुंबाच्या पोटापाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला. कोरोनाचा संसर्ग अल्प झाल्यावर पालिका प्रशासनाच्या वतीने स्वच्छता, गर्दी आदींचे कारण देत चौपाटी चालू करण्यास टाळाटाळ करण्यात येत होती.

लव्ह जिहाद’ला मुळासकट नष्ट करण्यासाठी सर्व हिंदू युवतींनी सक्षम आणि संघटित होणे आवश्यक ! – सुमित सागवेकर

हिंदु भगिनींचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा ‘लव्ह जिहाद’ म्हणजे आपल्या हिंदु संस्कृतीच्या अस्मितेवरच घाव घालणारे धर्मांधांचे फार मोठे षड्यंत्र आहे. याला वेळीच रोखले नाही, तर आपल्या देशामध्ये याची पाळेमुळे अजून घट्ट होत जातील. हे टाळण्यासाठी वेळीच सावध होऊया.

हिंदूंनो, श्रद्धास्थाने, गड-कोट येथील अतिक्रमणांच्या विरोधात आवाज उठवून त्यांच्या रक्षणासाठी कटीबद्ध व्हा ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

पुरातत्व विभाग हिंदूंच्या भावना पायदळी तुडवण्याचे काम करतो. त्यामुळे हिंदूंनाच आता पुढाकार घेऊन या संदर्भात आवाज उठवणे आवश्यक आहे.

पुढील काही वर्षे कोरोनाच्या संदर्भातील सर्व निर्बंध पाळावेच लागणार ! – तज्ञांचे मत

पुढील काही वर्षांसाठी आपल्या सर्वांनाच सामाजिक अंतर आणि तोंडावर मास्क घालून फिरावे लागेल, असे इंग्लंडमधील नागरी आरोग्य विभागाच्या लसीकरण विभागाच्या प्रमुख असणार्‍या डॉ. मेरी रॅमसे यांनी म्हटले आहे.

छत्रपती संभाजी महाराज बलीदान मासानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ११६ जणांनी केले रक्तदान !

श्री शिवप्रतिषठान हिंदुस्थानच्या सातारा विभागाच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलीदान मासानिमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. धारकर्‍यांकडून या रक्तदान शिबिरास उदंड प्रतिसाद लाभला.

पेण येथील दुर्गप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांचे तहसीलदार अन् पोलीस प्रशासन यांना निवेदन

‘पेण येथील सांक्षी गडावर होत असलेल्या अतिक्रमणाविषयी लक्ष घालून त्यातही सहकार्य करावे’, अशी विनंती करण्यात आली.

पुणे शहरापेक्षा पुणे ग्रामीणमध्ये महिला अत्याचाराचे गुन्हे अधिक असल्याचा ‘क्राइम इन महाराष्ट्र २०१९’चा अहवाल

राज्यात आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण ४८ टक्के असतांना महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांत आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण केवळ १३ टक्के आहे.

तमिळनाडूमध्ये द्रमुक आणि अण्णाद्रमुक १८० जागांवर निवडणूक लढवणार

देशातील ५ राज्यांत सध्या विधानसभेची निवडणूक होत आहे. तमिळनाडूमध्ये २३४ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यात द्रमुक आणि अण्णाद्रमुक प्रत्येकी १८० जागा लढवणार आहेत.