नवी देहली – पुढील काही वर्षांसाठी आपल्या सर्वांनाच सामाजिक अंतर आणि तोंडावर मास्क घालून फिरावे लागेल, असे इंग्लंडमधील नागरी आरोग्य विभागाच्या लसीकरण विभागाच्या प्रमुख असणार्या यांनी म्हटले आहे.
Masks and social distancing ‘could last years’, leading epidemiologist predicts https://t.co/jxZr4CxCkv
— BBC News (UK) (@BBCNews) March 21, 2021
डॉ. रॅमसे यांनी पुढे म्हटले की, या निर्बंधांच्या आधारेच आपल्याला अर्थव्यवस्थेला चालना द्यावी लागणार आहे. सरकारलाही कोणतेही निर्बंध हटवण्याआधी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. अधिक उपस्थिती असणार्या कार्यक्रमांवर आयोजकांसमवेत प्रशासनालाही अधिक काळजीपूर्वक पद्धतीने लक्ष द्यावे लागणार आहे. तसेच या अशा कार्यक्रमांच्या संदर्भात स्पष्ट निर्देश आणि नियम आखून देण्याचीही आवश्यकता आहे. जगभरातील सर्वच भागांमध्ये करोना लसीकरण योग्य प्रमाणामध्ये झाल्यानंतर, तसेच जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या न्यून झाल्यानंतर थोड्याफार प्रमाणामध्ये परिस्थिती कोरोना पूर्व काळासारखी असेल.