छत्रपती संभाजी महाराज बलीदान मासानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ११६ जणांनी केले रक्तदान !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा उपक्रम !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन करतांना सातारा शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शेलार आणि उपस्थित धारकरी

सातारा, २२ मार्च (वार्ता.) – श्री शिवप्रतिषठान हिंदुस्थानच्या सातारा विभागाच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलीदान मासानिमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. धारकर्‍यांकडून या रक्तदान शिबिरास उदंड प्रतिसाद लाभला. ११६ हून अधिक जणांनी रक्तदानाचे पवित्र कर्तव्य पार पाडले.

रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करतांना धारकरी

मोती चौक येथील त्रिंबक सभागृहामध्ये सकाळी १० वाजता वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शेलार आणि माजी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी प्रतिष्ठानचे जिल्हाप्रमुख सतीश ओतारी, तालुकाप्रमुख शुभम् शिंदे, शहरप्रमुख अजिंक्य गुजर, अभिजित बारटक्के, धनंजय खोले, उपस्थित होते.

संपूर्ण देशावर कोरोना महामारीचे सावट घोंगावत असतांना प्रतिष्ठानच्या धारकर्‍यांनी रक्तदान केले. शहरातील विविध मंडळांंमध्ये सध्या धर्मवीर बलीदान मासाचे नित्य श्‍लोक पठण चालू आहे. त्याच अनुषंगाने ‘अक्षय ब्लड बँके’च्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले होते.