पेण येथील दुर्गप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांचे तहसीलदार अन् पोलीस प्रशासन यांना निवेदन

गड संरक्षण आणि संवर्धन यांसाठी कृतीशील धर्मप्रेमींचा आदर्श सर्व शिवप्रेमींनी घ्यावा !

निवेदन स्वीकारतांना पेण येथील तहसीलदार डॉ. अरुणा बळीराम जाधव

पेण (जिल्हा रायगड), २२ मार्च (वार्ता.) – गडावरील झालेली अतिक्रमणे हटवून सर्व दोषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करावी, तसेच गडावरील मंदिरे आणि योद्ध्यांची स्मारके यांचा जीर्णोद्धार करावा, यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटना यांच्या वतीने पेण येथील तहसीलदार डॉ. अरुणा बळीराम जाधव यांना निवेदन देण्यात आले. तसेच ‘पेण येथील सांक्षी गडावर होत असलेल्या अतिक्रमणाविषयी लक्ष घालून त्यातही सहकार्य करावे’, अशी विनंती करण्यात आली. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, पेण यांच्या वतीने श्री. शेखर बामणे, श्री. अनिकेत खैरे, श्री. मयुरेश वेदपाठक आणि अन्य शिवप्रेमी, दुर्गप्रेमी आणि अभ्यासक श्री. गुरु पाटील, गोरक्षक श्री. मंगल पाटील, सनातन संस्थेचे श्री. दिलदास म्हात्रे, समितीचे श्री. मनीष माळी उपस्थित होते.