राज ठाकरे यांच्या अयोध्या दौर्‍यामुळे हिंदुत्वाच्या भूमिकेला बळकटी मिळेल ! – प्रवीण दरेकर

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप आणि मनसे युती करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. यावर दरेकर म्हणाले की, युती ही समविचारी घटकांची होत असते. हिंदुत्वाची भूमिका त्यांनी घेतली, तर हिंदुत्ववादी विचारांचे पक्ष आणि संघटना यांना एकत्र येण्यास निश्‍चितपणे चांगले वातावरण निर्माण होईल.

कर्नाटकातील भाजपच्या नेत्यांचे वक्तव्य अयोग्य ! – चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, भाजप

कर्नाटकमधील भाजपचे नेते करत असलेले वक्तव्य अयोग्य असून आम्ही त्याचा निषेध करतो. याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना भेटून आम्ही आमचे म्हणणे मांडणार आहोत.

राज्यातील प्रत्येक मंत्र्यांच्या जिल्ह्यात एल्गार परिषदेचे आयोजन करणार ! – विनायक मेटे, प्रमुख, शिवसंग्राम पक्ष

प्रत्येक मंत्र्याच्या जिल्ह्यात वेगवेगळी एल्गार परिषद आयोजित करण्यात येणार आहे, अशी घोषणा शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांनी ३० जानेवारी येथे पत्रकारांशी बोलतांना केली.

देहलतील बॉम्बस्फोटाचे आश्‍चर्य वाटत नाही ! – इस्रायलचे भारतातील राजदूत

इस्रायलच्या अन्वेषण यंत्रणा भारतीय यंत्रणांसमवेत मिळून स्फोटाचे अन्वेषण करत आहेत, असे इस्रायलचे भारतातील राजदूत रॉन मल्का यांनी या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले आहे.

‘अ‍ॅमेझॉन’समवेतचे सर्व करार संपुष्टात आणा ! – हिंदु विधीज्ञ परिषदेची केंद्र सरकारकडे मागणी

हिंदुद्वेषी ‘अ‍ॅमेझॉन’ समवेतचे सर्व करार रहित करण्यास सरकारला का सांगावे लागते ? सरकारला ते समजत नाही का ?, असे प्रश्‍न हिंदूंना पडतात ! 

देहलीतील इस्रायलच्या दूतावासाबाहेर बॉम्बस्फोट : ४ – ५ गाड्यांची हानी

राजधानी देहलीत अशा प्रकारचे बॉम्बस्फोट होणे अपेक्षित नाही !

भारत आणि पाक यांच्यात सैनिकी संघर्ष झाल्यास संपूर्ण जगासाठी विनाशकारी  ! – संयुक्त राष्ट्रे

असा संघर्ष झाल्याविना भारताला आणि जगाला शांतता लाभणार नाही, हीसुद्धा वस्तूस्थिती आहे !

युरोपीय संघाकडून भारताला नव्हे, तर पाकच्या बासमती तांदळाला ‘जीआय’ टॅग !

बासमती तांदळाचे मूळ भारतात आहे, असा दावा भारताने केला होता. हा तांदूळ हा भारत आणि पाकिस्तान दोन्हीकडे पिकतो, पाकच्या या दाव्याला मान्यता देत पाकला ‘बासमती’ तांदळाच्या जगप्रसिद्ध जातीचा ‘जीआय टॅग’ मिळाला आहे.

सिंघू सीमेवर स्थानिक नागरिक आणि आंदोलनकर्ते यांच्यात संघर्ष !

तलवारी, लाठीकाठ्या आदी साहित्य घेऊन आंदोलन करणारे आणि प्रसंगी पोलिसांवर आक्रमण करणार्‍या आंदोलनकर्त्यांना वठणीवर आणण्याचा आदेश सरकार पोलिसांना का देत नाही ?

सांगलीत वेश्या व्यवसाय चालणार्‍या हॉटेलवर धाड; आटपाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अटकेत

ज्यांच्यावर समाजात घडणारे गुन्हे रोखण्याचे दायित्व असते, तेच पोलीस अधिकारी जर वेश्या व्यवसायासारख्या प्रकरणात सापडत असतील, तर अशांकडून गुन्हा रोखण्याची अपेक्षा काय करणार ?