
मुंबई, १७ जुलै (वार्ता.) – ‘सासूमुळे वाटणी झाली आणि सासू वाट्याला आली’, ‘५० खोके एकदम ओके’ अशा घोषणा देत पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधीमंडळाच्या पायर्यांवर सरकारविरोधात आंदोलन केले. ‘घटनाबाह्य कलंकित सरकारचा धिक्कार असो’, अशा आशयाचे फलक या वेळी झळकवण्यात आले.
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्यजी ठाकरे यांनी विधिमंडळ पावसाळी अधिवेशनच्या पहिल्या दिवशी मविआ सहकाऱ्यांसोबत विधानभवनाच्या पायऱ्यांवर घटनाबाह्य सरकारविरोधात आंदोलन केले. @AUThackeray pic.twitter.com/eUG5XYMC5O
— Office Of Aaditya Uddhav Thackeray (@OfcOfAUT) July 17, 2023
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार समर्थक एकाही आमदाराची उपस्थिती नव्हती. ‘विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीसाठी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक चालू झाली आहे. विरोधी पक्षनेता हा काँग्रेसचाच असेल’, असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे.
(म्हणे) ‘हिंदी आणि उर्दू भारताच्या भाषा, तर संस्कृत बाहेरून आली !’ – Congress MP Mohammad Javed
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !