मुंबई – पाशवी बहुमताच्या बळावर विधान परिषदेचे कामकाज चालू देणार नाही, अशी भूमिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी १७ जुलै या दिवशी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांनी विधानसभेचे कामकाज स्थगित झाल्यानंतर राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांनी याविषयी सकारात्मक चर्चा केली असून आम्ही त्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा करत आहोत, असेही ते म्हणाले.
नीलमताई गोऱ्हे ह्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने विधानपरिषदेवर पाठवलेल्या प्रतिनिधी आहेत. पक्षातर्फे निलंबनाची नोटीस पाठवली असल्यामुळे त्यांना उपसभापती खुर्चीवर बसण्याचा नैतिक अधिकार नाही.
– अंबादास दानवे जी, विधानपरिषद विरोधी पक्ष नेते@iambadasdanve pic.twitter.com/zJOX9ADDDL— Shivsena Shrivardhan (@ShivSenaSRN) July 17, 2023
पत्रकारांशी बोलतांना अंबादास दानवे म्हणाले की, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांना पदावर रहाण्याचा अधिकार नाही. त्यांना तात्काळ दूर करण्याची मागणी आम्ही राज्यपालांकडे केली आहे. या आधीही गोर्हे यांच्यावर भाजपने अविश्वास प्रस्ताव दिलेला आहे. आता आम्हीही तसा प्रस्ताव दिलेला आहे. त्यामुळे त्यांना या पदावर काम करण्याचा नैतिक अधिकार नाही.