तृणमूल काँग्रेसच्या खासदार शताब्दी रॉय यांचे संतापजनक विधान
कोलकाता – तृणमूल काँग्रेसच्या खासदार शताब्दी रॉय म्हणाल्या की, राम बहुदा दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत आहे. त्यामुळे जसे बी.पी.एल्. (बिलो पॉवर्टी लाईन म्हणजे दारिद्र्यरेषेखाली) कार्ड असणार्या गरिबांसाठी घर बांधून दिले जाते, त्याप्रमाणे या योजनेच्या अंतर्गत भाजप त्याला घर बांधून देत आहे. भाजपवाले एवढे शक्तीशाली झाले आहेत की, ते आता रामाला घर बांधून देत आहेत. रामाचे पुत्र लव आणि कुश या दोघांना वेगवेगळी घरे बांधून दिल्यावर काम पूर्ण होईल.
(सौजन्य : Times Now)
१. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मुजुमदार यांनी टीका केली आहे. ‘शताब्दी रॉय यांच्या वक्तव्यातून तृणमूल काँग्रेसची मानसिकता दिसून येते. यामुळे जगभरातील हिंदूंचा अवमान झाला आहे’, असे त्यांनी म्हटले आहे.
२. तृणमूल काँग्रेसवाल्यांमध्ये असलेला हिंदुद्वेष नवीन नाही. याआधी वर्ष २०१९ मध्ये तृणमूल काँग्रेसच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कार्यक्रमात काहींनी ‘जय श्रीराम’ अशा घोषणा दिल्यावर बॅनर्जी यांनी त्यावर आक्षेप घेतला होता. त्या म्हणाल्या होत्या की, ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणारे गुंड आहेत आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. त्यानंतर घोषणा देणार्या १२ जणांना अटक करण्यात आली होती.
संपादकीय भूमिका
|