पुरी पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांचे स्पष्टीकरण !
गंगासागर (बंगाल) – आम्हा ४ शंकराचार्यांमध्ये श्रीराममंदिराच्या विषयावर मतभेद असल्याचा अपसमज पसरवला गेला आहे. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. आमचे एवढेच म्हणणे होते की, प्रभु श्रीरामाची प्रतिष्ठापना शास्त्रानुसार व्हावी. देवाची प्रतिमा किंवा मूर्ती यांमध्ये विधीवत देवाच्या तेजाचा प्रवेश होत असतो. विधिवत पूजा आणि प्राणप्रतिष्ठा झाली नाही, तर डाकीन, शाकिनी, भूत-प्रेत-पिशाच्च चारही दिशांना पसरतात आणि सर्व छिन्न-विछिन्न करतात. त्यामुळे शास्त्रसंमत पूजा व्हावी, अशी आमची इच्छा आहे. आम्हा चौघांचेही हेच म्हणणे आहे. त्यात कुठलेही मतभेद नाहीत, असे स्पष्टीकरण पुरी पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी ‘श्रीराममंदिराला चारही शंकराचार्यांचा विरोध आहे’, या समाजात पसरलेल्या वृत्तावर दिले. ते ए.एन्.आय. या वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीशी बोलत होते.
सौजन्य : एकॉनॉमिक टाइम्स
Jagadguru Shankaracharya Swami Nishchalanand Saraswati of the Puri Peeth, clarifies!
Amongst us four Shankaracharyas, there is no difference of opinion on the matter of the Shri Ram temple.
अयोध्या I राम मंदिर प्राण प्रतिष्ठा I
शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती… pic.twitter.com/4W6jUSWOk7— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 14, 2024
मी कुणालाही अयोध्येत जाण्यापासून रोखत नाही !
मकरसंक्रातीनिमित्त बंगालमध्ये गंगासागर मेळा भरला आहे. या मेळ्यात पवित्र स्नान करण्यासाठी शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती आलेले आहेत. त्या वेळी ते पत्रकारांना म्हणाले की, २२ जानेवारी या दिवशी मी अयोध्येत जाणार नाही. याचा अर्थ असा नाही की, मी अयोध्यावर नाराज आहे. मी कुणालाही अयोध्येत जाण्यापासून रोखतही नाही.