Kolkata Bhagavad Gita : कोलकाता येथे १ लाखाहून अधिक लोकांनी केले सामूहिक गीतापठण !

  • ६० सहस्र महिलांनी एकत्रित केला शंखनाद !

  • कार्यक्रमामुळे झाला विश्‍वविक्रम !

कोलकाता (बंगाल) – नुकत्याच झालेल्या गीता जयंतीनिमित्त येथील ब्रिगेड परेड मैदानावर २४ डिसेंबर या दिवशी १ लाखाहून अधिक लोकांनी एकत्र बसून गीतापठण केले. हा विश्‍वविक्रम ठरला. या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय संस्कृत परिषद आणि मोतीलाल भारत तीर्थ सेवा मिशन यांनी केले होते. यात देश आणि विदेश येथून ३०० हून अधिक संत उपस्थित होते. याखेरीज बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस, मुख्यमंत्री ममता बनर्जी आणि अन्य मान्यवर यांना आमंत्रित करण्यात आले होते.

आयोजकांनी सांगितले की, या पठणामध्ये सहभागी होण्यासाठी १ लाख ३० सहस्र लोकांनी नावे नोंदवली होती. पठणाच्या वेळी ६० सहस्र महिलांनी एकत्रित शंखनाद केला. हाही एक विश्‍वविक्रम झाला.

संपादकीय भूमिका

केंद्र सरकारने देशातील प्रत्येक शाळेमध्ये गीता शिकवणे बंधनकारक केले पाहिजे !