Kalyan Banerjee Mimicry : (म्हणे) ‘मिमिक्री (नक्कल) करणे, हा माझा मूलभूत अधिकार असून मी ती सहस्रो वेळा करीन !

तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांचा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याविषयीचा उद्दामपणा कायम !

उपराष्ट्रपती जगदीप धनखड व तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी

कोलकाता (बंगाल) – संसदेबाहेर आंदोलन करतांना तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभेचे सभापती आणि देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल केली होती. यावरून त्यांच्यासह अन्य अनेक खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. या घटनेवरून कोलकाता येथील एका सभेत बोलतांना खासदार कल्याण बॅनर्जी  म्हणाले की, मी मिमिक्री करत रहाणार आहे. ही एक कला आहे. आवश्यकता भासली, तर सहस्रो वेळा करीेन. मला माझे मत मांडण्याचा मूलभूत अधिकार आहे. तुम्ही मला मारू शकता; पण मी मागे हटणार नाही, मी लढत राहीन.

बॅनर्जी पुढे म्हणाले की, कुणालाही दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नाही. मला एक प्रश्‍न आहे. ते (जगदीप धनखड) खरच राज्यसभेत असे वागतात का ? यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनीही लोकसभेत मिमिक्री केली होती.

संपादकीय भूमिका

नकालाकारांनी नकला करून लोकांचे मनोरंजन करणे, ही एक कला मानली जाते; मात्र एका खासदाराने उपराष्ट्रपतींवर टीका म्हणून नक्कल करणे, ही कला नसून द्वेष आहे आणि त्यासाठी संबंधितांना शिक्षा होणे आवश्यक आहे !