Reward Announced For Breaking Aurangzeb’s Tomb : औरंगजेबाची कबर तोडल्यास १०० गुंठे भूमी आणि ११ लाख रोख देणार !

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथील शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांची घोषणा

शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बिट्टू सिखेडा

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – औरंगजेबाची कबर तोडल्यास १०० गुंठे भूमी आणि ११ लाख रोख रक्कम देण्याची घोषणा येथील शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बिट्टू सिखेडा यांनी केली आहे. त्यांनी या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने एक निवेदन जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करतांना सिखेडा म्हणाले की, औरंगजेबाचे समर्थन करणार्‍यांना चपलेने मारले पाहिजे. देशातल्या मोगलांच्या सर्व कबरी आणि त्यांच्या नावाच्या पाट्या उखडून काढल्या पाहिजेत, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.