राज्यातील १०० मंदिरांत भाविकांना न्याहारी देण्याची तमिळनाडू सरकारची योजना !

मुळात द्रमुक हा हिंदुविरोधी पक्ष असून त्यास मत न देण्यातच तमिळनाडूतील हिंदूंचे हित आहे. अर्थात् गेल्या अनेक दशकांच्या तेथील द्रविड आंदोलनाचा वैचारिक पगडाही तेथील हिंदूंवर आहे.

(म्हणे) ‘ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या धर्मप्रसारामध्ये काहीही अवैध नाही !’ – तमिळनाडूतील द्रमुक सरकार

ख्रिस्ती मिशनरी अवैधरित्या काही करत नसल्याचाही केला दावा !

गुरुचंद्र मलिगई (चेन्‍नई) येथे तमिळ भाषेतील ‘भारतीय अर्थव्‍यवस्‍थेवरील नवे आक्रमण : हलाल जिहाद ?’ ग्रंथाचे प्रकाशन

‘चाणक्‍य वाहिनी’चे श्री. रंगराज पांडे यांनी श्री. रमेश शिंदे यांची भेट घेऊन ‘हलाल’विषयी विस्‍तृत चर्चा केली. त्‍यांनी श्री. शिंदे यांना संत थिरुवल्लुवर यांची प्रतिमा भेट दिली.

चेन्नई येथे तमिळ भाषेतील ‘भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे आक्रमण : हलाल जिहाद ?’ ग्रंथाचे प्रकाशन

या कार्यक्रमाला ‘हिंदू मक्कल कत्छी’ चे अध्यक्ष श्री. अर्जुन संपथ, ‘नॅशनल मिडिया पीपल वेल्फेअर असोसिएशन’चे अध्यक्ष श्री. प्रकाश एम्. स्वामी आणि सरचिटणीस श्री. जयकृष्णन्, ‘विश्व हिंदु परिषदे’चे श्री. श्रीधरन् यांच्यासह अनेक हिंदुत्वनिष्ठ नेते अन् प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या दलितांना आरक्षणाचा लाभ मिळावा ! – तमिळनाडू विधानसभेत ठराव संमत

असा ठराव संमत करून द्रमुक सरकारने एकप्रकारे धर्मांतराला प्रोत्साहन दिले आहे. यामुळे ख्रिस्ती धर्मप्रचारक दलितांचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर करतील. द्रमुक सरकार खाली खेचण्यासाठी आता तेथील हिंदूंनीच प्रयत्न करणे आवश्यक !

तिरुप्पुर (तमिळनाडू) येथे ‘हिंदू मक्कल कत्छी’चे अध्यक्ष श्री. अर्जुन संपथ यांच्या हस्ते तमिळ भाषेतील ‘हलाल जिहाद ?’ ग्रंथाचे प्रकाशन

हिंदु जनजागृती समितीनिर्मित ‘भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे आक्रमण : हलाल जिहाद ?’ या तमिळ भाषेतील ग्रंथाचा प्रकाशन सोहळा पार पडला.

तंजावर (तमिळनाडू) येथे ‘श्री विवेकानंद पेरावई’चे अध्‍यक्ष श्री. परमानंदम् यांच्‍या हस्‍ते तमिळ भाषेतील ‘भारतीय अर्थव्‍यवस्‍थेवरील नवे आक्रमण : हलाल जिहाद ?’ ग्रंथाचे प्रकाशन

या सोहळ्‍याचे आयोजन ‘हिंदु इळैंगर येळूच्‍ची पेरवई (हिंदु युवा जागरूकता महासंघ)’चे राज्‍यप्रमुख श्री. पाला संतोष यांनी केले होते. हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते श्री. रमेश शिंदे हेही या कार्यक्रमाला उपस्‍थित होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या अनुमतीनंतर तमिळनाडूमध्ये रा.स्व. संघाकडून ४५ ठिकाणी काढण्यात आल्या फेर्‍या !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून १६ एप्रिल या दिवशी राज्यातील ४५ ठिकाणी भव्य फेर्‍या काढण्यात आल्या. राज्याचे मुख्यमंत्री स्टॅलिन सरकारकडून या फेर्‍यांवर बंदी घालण्यात आली होती.

कन्याकुमारी (तमिळनाडू) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अज्ञातांकडून तोडफोड !

संतप्त नागरिकांकडून निदर्शने

(म्हणे) ‘काँग्रेसची सत्ता आल्यावर राहुल गांधी यांना शिक्षा सुनावणार्‍या न्यायाधिशांची जीभ कापू !’ – तमिळनाडूतील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मणीकंदन

अशा पदाधिकार्‍यांचा भरणा असलेला काँग्रेस पक्ष कायद्याचे राज्य काय देणार ?