(म्हणे) ‘काँग्रेसची सत्ता आल्यावर राहुल गांधी यांना शिक्षा सुनावणार्‍या न्यायाधिशांची जीभ कापू !’ – तमिळनाडूतील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मणीकंदन

  • तमिळनाडूतील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मणीकंदन यांची धमकी !

  • पोलिसांकडून मणीकंदन यांच्या विरोधात गुन्हा नोंद !

तमिळनाडूतील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मणीकंदन (डावीकडे) राहुल गांधी (उजवीकडे)

चेन्नई (तमिळनाडू)- तमिळनाडूच्या डिंडीगुल जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष मणीकंदन यांनी ‘काँग्रेसची सत्ता आल्यावर राहुल गांधी यांना २ वर्षांची शिक्षा देणार्‍या न्यायाधिशांची जीभ कापण्यात येईल’, अशी धमकी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मणीकंदन यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. राहुल गांधी यांना सुरत सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एच्. वर्मा यांनी मोदी आडनावावरून मानहानी केल्याच्या प्रकरणी २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी राहुल गांधी यांना जामीन मिळाला आहे.

संपादकीय भूमिका

अशा पदाधिकार्‍यांचा भरणा असलेला काँग्रेस पक्ष कायद्याचे राज्य काय देणार ?