चेन्नई (तमिळनाडू) – येथील गुरुचंद्र मलिगई येथील ‘एम्.के.बी.’ नगर येथे हिंदु जनजागृती समितीने प्रकाशित केलेल्या ‘भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे आक्रमण : हलाल जिहाद ?’, या तमिळ भाषेतील ग्रंथाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. या वेळी कलिगंबल मंदिराचे श्री. सिवाश्री आणि श्री. कालिदास सिवाचरियर, भाजपचे असंघटित युवा गटाचे नेते श्री. जी. राधाकृष्णन्, ‘भारतीय हिंदु मुन्नानी’ (हिंदू आघाडीवर)चे संस्थापक श्री. आर्.डी. प्रभु, अखिल भारत हिंदु महासभेचे श्री. रविचंद्रन्, अधिवक्ता मणीवेल, अधिवक्ता मुथरासू आणि समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे उपस्थित होते. या कार्यक्रमाला हिंदु जनजागृती समितीच्या पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांची वंदनीय उपस्थिती लाभली.
या वेळी श्री. शिंदे यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा राष्ट्रीय सुरक्षेला असलेला धोका याविषयी थोडक्यात माहिती सांगितली.
हिंदुत्वनिष्ठांनी केलेले मार्गदर्शन
१. या वेळी कलिगंबल मंदिराचे श्री. कालिदास सिवाचरियर यांनी ‘हिंदूंनी हा विषय गांभीर्याने घ्यावा’, असे आवाहन केले.
२. श्री. प्रभु यांनी ‘हलालविषयीचा धोका लक्षात घेऊन तो थांबवण्यासाठी प्रत्यक्ष कृती करण्याची आवश्यकता आहे’, असे सांगितले.
३. अधिवक्ता मणीवेल आणि अधिवक्ता मुथरासू यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थेवर आळा घालण्याच्या कार्यामध्ये आमचा पाठिंबा असेल’, असे सांगितले.
क्षणचित्रे
१. ‘पीगुरूज्’ वृत्तवाहिनीचे श्री. जयकृष्णनजी यांनी श्री. रमेश शिंदे यांची इंग्रजी भाषेत मुलाखत घेतली.
२. श्री. सिवाचरियर यांनी ‘हलाल जिहाद’चे ग्रंथ विकत घेऊन त्यांचे हिंदूंना वितरण करणार असल्याचे सांगितले.
३. ‘चाणक्य वाहिनी’चे श्री. रंगराज पांडे यांनी श्री. रमेश शिंदे यांची भेट घेऊन ‘हलाल’विषयी विस्तृत चर्चा केली. त्यांनी श्री. शिंदे यांना संत थिरुवल्लुवर यांची प्रतिमा भेट दिली.