राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे निधन !

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा गुरसाळे (तालुका-पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भारत तुकाराम भालके (वय ६० वर्षे) यांचे २७ नोव्हेंबरच्या मध्यरात्री पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.

संग्राम देशमुख आणि जितेंद्र पवार यांना निवडून आणा ! – संजय केळकर, आमदार, भाजप

श्री. संग्राम देशमुख आणि श्री. जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ गावभाग येथील हरिदास भवन येथे पदवीधर शिक्षकांसाठीच्या मेळाव्यात ठाण्याचे भाजप आमदार श्री. संजय केळकर बोलत होते.

लसनिर्मिती प्रक्रियेची माहिती घेण्यासाठी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला पंतप्रधान मोदींची भेट !

सिरम इन्स्टिट्यूटच्या लसीच्या निर्मितीची प्रक्रिया कुठपर्यंत आलीय हे पहाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ नोव्हेंबर या दिवशी सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत.

(म्हणे) ‘छळापासून वाचायचे असेल, तर हिंदु तरुणींना बहीण मानावे !’  

धर्मांधांच्या विरोधात कायदा म्हणजे ‘छळ’ असे समजणारे धर्मांध नेते ! धर्मांधांच्या विरोधात कायदा केला, तर त्यांच्यावर वचक बसवता येऊ शकतो, हेच यातून लक्षात येते. तरीही यावर समाधानी न रहाता हिंदूंनी सतर्क राहून हिंदु तरुणींचे रक्षण केले पाहिजे !

हिंदु देवतांचा अवमान करणार्‍या अनुराग बसू यांच्या ‘लुडो’ चित्रपटास ट्विटरवरून विरोध

हिंदू किती दिवस अशा प्रकारे विरोध करत रहाणार ? सरकार अशा चित्रपट आणि वेब सिरीजवर कारवाई कधी करणार ?

मंगळुरू येथे लष्कर-ए-तोयबा आणि तालिबान यांच्या समर्थनार्थ भिंतीवर लिखाण

देशविघातक लिखाण करणार्‍या प्रत्येकाला शोधून त्यांना आजन्म कारागृहात डांबण्याची शिक्षा केली पाहिजे !

पाकच्या गोळीबारात २ सैनिक हुतात्मा

पाकच्या सैन्याने राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमधील नियंत्रणरेषेजवळ शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन केलेल्या गोळीबारात २ सैनिक हुतात्मा झाले.

नौदलाच्या ‘मिग २९ के’ या प्रशिक्षण देणार्‍या विमानाला अरबी समुद्रात अपघात : एक वैमानिक बेपत्ता

भारतीय नौदलाच्या ‘मिग २९ के’ या प्रशिक्षण देणार्‍या विमानाला अरबी समुद्रात अपघात झाला. ही घटना २६ नोव्हेंबरला सायंकाळी घडली. विमानातील एका वैमानिकाला वाचवण्यात आले आहे, तर दुसर्‍याचा शोध घेतला जात आहे.

‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यावरून तक्रार

सिकंदरपूरमधील आचार्य चंद्रकिशोर पराशर यांनी येथील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात दूरचित्रवाहिनीवरील ‘कौन बनेगा करोडपती’ या कायक्रमाच्या विरोधात धार्मिक भावनांना ठेच पोचवल्यावरून तक्रार केली आहे.

राजभवनात मुसलमानांना नमाजासाठी देण्यात आलेल्या जागेप्रमाणे हिंदूंनाही उपासनेसाठी मोठी जागा द्यावी ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

राजभवनात हिंदूंनाही उपासना, आरती, पूजा आणि उत्सव साजरे करण्यासाठी मोठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने राज्यपालांकडे केली आहे