(म्हणे) ‘नथुराम गोडसे देशातील पहिला आतंकवादी आहे ! – काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह

  • कुणाला आतंकवादी म्हणावे, हेही न कळलेले काँग्रेसी ! जिहादी आतंकवादी ओसामा बिन लादेन याला आदराने ‘ओसामाजी’ म्हणणार्‍या दिग्विजय सिंह यांनी असे विधान करण्यात नवल ते काय ?
  • आझाद हिंद सेना इंग्रजांची लढत असतांना ‘तिने भारतात पाऊल टाकल्यास मी तलवार घेऊन तिला विरोध करीन’, असे विधान पंडित जवाहरला नेहरू यांनी केलेले विधान देशभक्तीतून होते का ? 
  • पाकिस्तानला वर्ष १९४७ मध्ये ५५ कोटी रुपये (आताचे ५ सहस्र ११२ कोटी रुपये) देण्यासाठी उपोषण करणारे म. गांधी देशभक्त होते, असे म्हणता येईल का ?
  • गांधींची हत्या केली म्हणून नथुराम गोडसे यांना आतंकवादी म्हणणारी काँग्रेस स्वामी श्रद्धानंद यांची हत्या करणारा रशीद (ज्यांना म. गांधी यांनी ‘रशीद भाई’ संबोधले होते)याला कधी आतंकवादी म्हणत नाही, हे लक्षात घ्या !

काँग्रेस केवळ देशभक्तांचा अवमान करणेच शिकली ! – साध्वी प्रज्ञासिंह यांचे प्रत्युत्तर

भोपाळ (मध्यप्रदेश) – काँग्रेस केवळ देशभक्तांचा अपमान करणेच शिकली आहे.  त्यांच्या नेत्यांनी ‘भगवा आतंकवाद’ सारख्या शब्दांचा वापर केला आहे, याहून अधिक लज्जास्पद गोष्ट काय असू शकते ?, असे प्रत्युत्तर भाजपच्या येथील खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांनी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांना दिले आहे. ‘नथुराम गोडसे भारतातील पहिला आतंकवादी आहे’ असे विधान दिग्विजय सिंह यांनी केले होते.

लोकसभा निवडणुकीच्या वेळीही साध्वी प्रज्ञासिंह  यांनी गोडसे देशभक्त असल्याचे म्हटले होते. यानंतर यावरून भाजपला स्पष्टीकरणही द्यावे लागले होते.