भारतातील कोरोना लसीवर विश्‍वास नसेल, तर मुसलमानांनी पाकिस्तानात जावे ! – संगीत सोम, आमदार, भाजप, उत्तरप्रदेश

भाजपचे आमदार संगीत सोम

मेरठ (उत्तरप्रदेश) – ज्या मुसलमानांना देशात निर्माण करण्यात आलेल्या कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीवर विश्‍वास नसेल, त्यांनी पाकिस्तानात जावे, असे विधान भाजपचे आमदार संगीत सोम यांनी केले आहे. ते ‘टाइम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते. कोरोना लसीत डुक्कराची चरबी मिसळल्याचा आरोप काही मुसलमान  संघटनांकडून करण्यात आला होता. यासंदर्भात आमदार संगीत सोम यांना प्रश्‍न विचारण्यात आला. त्या वेळी त्यांनी वरील उत्तर दिले.
आमदार संगीत सोम म्हणाले की, काही मुसलमानांचा देशावर, देशातील शास्त्रज्ञांवर, पोलिसांवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्‍वास नाही, हे दुर्दैवी आहे. त्यांचा आत्मा पाकिस्तानात आहे. त्यांनी पाकिस्तानातच जावे आणि आमच्या शास्त्रज्ञांच्या कामावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करू नये.