आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या माजी खासदाराला अटक

सहस्रो रुपयांचे आर्थिक घोटाळे करणार्‍यांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !

नवी देहली – १ सहस्र ९०० कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी तृणमूल काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार के.डी. सिंह यांना नवी देहली येथे अंमलबजावणी संचलनालयाने (‘ईडी’ने) अटक केली. ‘अलकेमिस्ट’ समूहाचे प्रमुख के.डी. सिंह यांच्यावर ‘रोझ व्हॅली’ आणि ‘शारदा चिटफंड’ घोटाळ्यात हात असल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात चौकशीसाठी अंमलबजावणी संचलनालयाकडून सिंह यांना बोलावण्यात आले होते. दीर्घकाळ चौकशीनंतर त्यांच्या उत्तरांवर समाधानी नसल्याने त्यांना अटक करण्यात आली. यापूर्वी ‘ईडी’कडून के.डी. सिंह यांच्याशी निगडीत आस्थापनाची २३९ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली होती.