पिंपरी- आर्थिक लाभासाठी टोळी बनवून दहशत पसरवणार्या शहरातील २ टोळ्यांवर गुन्हे शाखेने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मकोका) कायद्यांतर्गत कारवाई केली आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी दिली. त्यात निगडीमधील अमोल वाले टोळी आणि पिंपरीतील धर्मेश पाटील टोळी यांचा समावेश आहे.
याविषयीचे आदेश १२ जानेवारी या दिवशी अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिले आहेत.
निगडी ओटा परिसरात दहशत पसरवणार्या वाले टोळीचा प्रमुख अमोल बसवराज वाले आणि पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वर्चस्वासाठी आणि आर्थिक लाभासाठी टोळी बनवून संघटित गुन्हे करणार्या पाटील टोळीचा प्रमुख धर्मेश श्यामकांत पाटील यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे.