‘गोडसे ज्ञानशाळा’ वाचनालय पोलिसांकडून बंद !

कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण सांगत पोलिसांकडून कारवाई !

  • मशिदी आणि मदरसे यांतून भारतविरोधी आणि हिंदुविरोधी कारवाया चालतात, तसेच त्याविरोधात विखारी प्रसारही केला जातो. असे असतांना त्यांवर बंदी घालण्याचे धारिष्ट्य पोलीस दाखवतील का ?
  • ‘देशात वैचारिक स्वातंत्र्यावर बंधन घालणे, हे लोकशाहीच्या विरोधात आहे’, असे म्हणणारे आता गप्प का ?
उद्घाटनाच्या दुसर्‍याच दिवसानंतर ‘गोडसे ज्ञानशाळा’ नावाच्या वाचनालयाला कुलूप लावले, फलक काढून, १४४ कलम लावले

ग्वाल्हेर – अखिल भारतीय हिंदु महासभेचे चालू केलेले ‘गोडसे ज्ञानशाळा’ नावाचे वाचनालय जिल्हा प्रशासनाने २ दिवसांतच बंद पाडले आहे. २ दिवसांपूर्वी मध्यप्रदेशमधील ग्वाल्हेर येथील आपल्या कार्यालयात अखिल भारतीय हिंदु महासभेने ‘गोडसे ज्ञानशाळा’ नावाचे वाचनालय चालू केले होते. प्रशासनाने वाचनालयातील साहित्यही जप्त केले आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

(सौजन्य : Search Soon)

ग्वाल्हेरचे पोलीस अधिक्षक अमित संघी म्हणाले, ‘‘हिंदु महासभेच्या सदस्यांसमवेत बैठक झाली आणि ज्ञानशाळा बंद करण्यात आली. सामाजिक माध्यमांद्वारे ‘गोडसे ज्ञानशाळे’च्या नावाने गंभीर संदेश पसरत होते. कायदा व सुव्यवस्था सुनिश्‍चित करण्यासाठी जिल्हा दंडाधिकार्‍यांनी परिसरात कलम १४४ लागू केल्यानंतर दुसर्‍याच दिवशी हे वाचनालय बंद करण्यात आले. या वाचनालयाद्वारे युवकांपर्यंत नथुराम गोडसे यांचे विचार पोचवले जाणार होते.