राजस्थानमध्ये दोघा उपदंडाधिकार्‍यांना लाच घेतांना अटक

  • काँग्रेसच्या राज्यातील प्रशासकीय अधिकार्‍यांची लाचखोरी ! याला काँग्रेस सरकारचा पाठिंबा आहे का ?, असा प्रश्‍न जनतेच्या मनात उत्पन्न होतो !
  • अशा भ्रष्टाचार्‍याची सर्व संपत्ती जप्त करून त्यांची समाजात छी-थू झाल्याविना इतरांवर वचक बसणार नाही !

दौसा (राजस्थान) – राजस्थान प्रशासकीय सेवेतील २ अधिकार्‍यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने लाच घेतांना रंगेहाथ अटक केली. रस्त्याच्या कामासाठी या दोघांनी एका खासगी आस्थापनाकडून प्रत्येकी ५ लाख रुपयांची लाच मागितली होती. बांदीकुई येथील उपविभागीय दंडाधिकारी पिंकी मीना आणि दौसा उपविभागीय दंडाधिकारी पुष्कर मित्तल अशी त्यांची नावे आहेत.