कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी तासगाव (जिल्हा सांगली) येथे महिला पोलीस नाईक विजयश्री विशाल मदने यांच्यावर गुन्हा नोंद

दीर्घकाळ कामावर अनुपस्थित राहून शासकीय कार्यालयीन कागदपत्रे, शासकीय कार्यालयात आणि न्यायालयात जमा न करता स्वतःच्या कह्यात ठेवल्याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यातील महिला पोलीस नाईक विजयश्री विशाल मदने यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पारनेर तालुक्यातील बांगलादेशी नागरिकांचे मतदार सूचीतील नाव रहित करण्यासाठी मनसेची आंदोलनाची चेतावणी

अन्य देशांप्रमाणे घुसखोरीच्या विरोधात कठोर शिक्षेची तरतूद करून त्याची कार्यवाही केल्यासच घुसखोरीच्या समस्येला आळा बसेल !

‘शिव-समर्थ’ शिल्प कुणाच्याही दबावाला बळी पडून हटवण्यात येऊ नये !

विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संप्रदाय यांची प्रशासनाकडे मागणी

‘टीआरपी’ घोटाळ्याप्रकरणी पोलिसांची ‘बार्क’च्या कार्यालयात धडक

रिपब्लिक टी.व्ही.चे आर्थिक चढउतार पडताळण्यासाठी पोलिसांनी ‘फॉरेन्सिक ऑडिट’चा अहवाल मागितला

ज्येष्ठ नागरिकांना विविध सेवा पुरविणार्‍या ‘केअर टेकर एजन्सी’वर पोलिसांची नजर ! – पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता

ज्येष्ठ नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा पुरवणार्‍या काही ‘केअरटेकर एजन्सी’ अपप्रकार करत असल्याचे आढळले आहे. त्यांचा शोध घेऊन, त्यांची सखोल चौकशी करून दोषी असणार्‍या एजन्सीवर कडक कारवाई करणार असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्पष्ट केले.

अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ आणि अंबिका योग कुटीर यांच्याकडून विनामूल्य ‘ऑनलाईन’ योगप्रशिक्षण !

कोरोनाच्या काळात विनामूल्य योग प्रशिक्षण देणार्‍या संघटनांचा स्तुत्य उपक्रम

कराड (जिल्हा सातारा) येथील सासवे कुटुंबातील ३ सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू

कराड तालुक्यातील सैदापूर येथील ‘मिलिटरी होस्टेल’जवळ सासवे कुटुंबीय वास्तव्यास आहे. याच कुटुंबातील ३ सख्ख्या बहिणींचा १८ डिसेंबरच्या पहाटे उलट्या आणि जुलाब होऊन दुर्दैवी मृत्यू झाला.

गोवा मुक्तीदिनाच्या निमित्ताने काही वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे दोनदिवसीय गोवा भेटीसाठी १९ डिसेंबर या दिवशी दुपारी दाबोळी विमानतळावर आगमन झाले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांचे स्वागत केले.

कोरोनाच्या विरोधातील लस घेणे ऐच्छिक ! – केंद्र सरकार

एखाद्याला पूर्वी कोरोनाची लागण झाली असेल किंवा नसेल, तरीही लसीची पूर्ण मात्रा घेणे आवश्यक आहे, तरच विषाणूच्या विरोधात प्रतिकारशक्ती निर्माण होईल. लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर २ आठवड्यांनी आवश्यक त्या अँटिबॉडीज निर्माण होतात.