शेतकर्‍यांचे १८ फेब्रुवारीला देशव्यापी रेल्वे बंद आंदोलन

[WPI_DISPLAY_SHARE_ICONS]

बंद म्हणजे जनतेला वेठीस धरून स्वतःचा स्वार्थ साधणे होय ! अशा बंदमुळे देशाची सहस्रो कोटी रुपयांची हानी होते, ती असे आंदोलन करणार्‍यांकडून वसूल केली पाहिजे अन्यथा त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !

शेतकर्‍यांचे १८ फेब्रुवारीला देशव्यापी रेल्वे बंद आंदोलन

नवी देहली – गेल्या ७५ दिवसांपासून देहलीच्या सीमेवर कृषी कायदे रहित करण्यासाठी आंदोलन करत असलेल्या शेतकर्‍यांनी १८ फेब्रुवारीला देशव्यापी रेल्वे बंद आंदोलन करण्याचे घोषित केले आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दुपारी १२ ते ४ अशा ४ घंट्यांत हे आंदोलन केले जाणार आहे.

आंदोलनाचाच एक भाग म्हणून आंदोलनकर्त्यांनी १२ फेब्रुवारीपासून राजस्थानच्या रस्त्यांवरील सर्व टोल वसुली करू न देण्याचाही निर्णय घेतला आहे. याशिवाय १४ फेब्रुवारीला देशभरात मेणबत्ती मोर्चा आणि मशाल मोर्चा काढला जाणार आहे. पुलवामा आक्रमणात हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या सन्मानार्थ हे मोर्चे काढण्यात येणार आहेत.

[WPI_DISPLAY_SHARE_ICONS]