१३० पेक्षा अधिक भाजप कार्यकर्त्यांची तृणमूल काँग्रेसच्या गुंडांकडून हत्या ! – गृहमंत्री अमित शाह

इतक्या मोठ्या संख्येने भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्या होऊनही केंद्रातील भाजप सरकारने बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेची दयनीय स्थिती पाहून राज्य सरकार विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही ?, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात उपस्थित होतो !

कुचबिहार (बंगाल) – बंगालमध्ये ममता बॅनर्जी या गुंडांच्या बळावर निवडणूक जिंकतात. आतापर्यंत १३० पेक्षा अधिक भाजप कार्यकर्त्यांची तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी हत्या केली; मात्र कोणतीही कारवाई झालेली नाही, असा गंभीर आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे एका सभेत बोलतांना केला.

‘जर बंगालमध्ये ‘जय श्रीराम’ म्हणणार नाही, तर मग काय पाकिस्तानात म्हणणार का?’ असा प्रश्‍नही शहा यांनी तृणमूल काँग्रेसला उद्देशून केला. ‘निवडणूक संपेपर्यंत ममता बॅनर्जीदेखील ‘जय श्रीराम’ म्हणतील. केवळ एका विशिष्ट वर्गाची मते मिळवण्यासाठी ममता बॅनर्जी जय श्रीरामला विरोध करत आहेत’, असेही त्यांनी या वेळी दावा केला.