सिंदफळ (जिल्हा धाराशिव) येथील हिंदू बांधवांकडून राममंदिर उभारणीसाठी ४५ सहस्र रुपये निधी अर्पण !

सिंदफळ येथील हिंदू बांधवांकडून सर्वांनी आदर्श घ्यावा !

सिंदफळ (जिल्हा धाराशिव), ११ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील धर्मप्रेमी हिंदूंनी गावातील घरोघरी जाऊन अयोध्येतील राममंदिराच्या उभारणीसाठी ४५ सहस्र रुपये निधी गोळा केला आहे. विशेष म्हणजे गावातील सर्व हिंदू बांधवांनी स्वत:च्या नावे निधी न देता गावातील मंदिराच्या नावे हा निधी सुपूर्द केला.