पुणे महापालिकेच्या मुख्य रुग्णालयांतील काही जागा वापराविना पडून

 पुणे महापालिका प्रशासनाचा ढिसाळ कारभार !

पुणे – येथील महापालिकेच्या मुख्य रुग्णालयांमध्ये काही लाख चौरस फूट जागा वापराविना पडून आहे. योग्य नियोजन करून ही जागा वापरात आणली, तर अडचणीच्या वेळी त्या ठिकाणी ८ ते १० सहस्र रुग्णांवर उपचार होऊ शकतात, तेही केवळ २०० ते ३०० कोटी रुपयांमध्ये ! ही रिकामी जागा पूर्ण क्षमतेने वापरली जात नसून ती धूळखात पडून आहे, याचा वापर महापालिका प्रशासन का करत नाही ? असा प्रश्‍न पुणेकरांकडून उपस्थित केला जात आहे.

महापालिकेची शहरात ७१ रुग्णालये आणि बाह्य रुग्ण विभाग आहेत. त्यापैकी कमला नेहरू, लायगुडे आणि राजीव गांधी अशी मुख्य रुग्णालये आहेत. त्यांचा वापर सध्यातरी पूर्ण क्षमतेने केला जात नाही. शहराची आवश्यकता लक्षात घेतल्यास तेथे अतीदक्षता विभाग, ऑक्सिजन विभाग अशा प्रकारच्या विविध सुविधा त्वरित आणि अल्प व्ययात उपलब्ध होऊ शकतात; मात्र ते करण्यापेक्षा सल्लागार नेमण्यावर आणि त्याच्याकडून आराखडा सिद्ध करण्यावर प्रशासनाकडून भर का दिला जात आहे ?, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.