|
नवी देहली – देशात काही लोकांकडून मुसलमानांना ‘परके’ करण्याचा संघटित प्रयत्न चालू आहेे, असा फुकाचा आरोप माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी येथे एका कार्यक्रमात केला. अन्सारी यांच्या ‘बाय मेनी अ हॅपी अॅक्सीडन्ट : रिकलेक्शन ऑफ लाईफ’ या त्यांच्या पुस्तकाच्या परिचर्चेत ते बोलत होते.
Concerted Effort By Some To Regard Muslims As “Others”: Hamid Ansari https://t.co/Lxf3DEWgSA pic.twitter.com/ibLFX4NSGO
— NDTV News feed (@ndtvfeed) February 10, 2021
अन्सारी पुढे म्हणाले की, आपण मुसलमान आहोत, हे महत्त्वाचे नाही, तर आपल्याकडची व्यावसायिक योग्यता महत्त्वाची आहे. मी या देशाचा नागरिक आहे कि नाही ? जर मी या देशाचा नागरिक असेन, तर मलाही ज्या एखाद्याला नागरिकत्वामुळे मिळतात त्या सर्व गोष्टींचा लाभार्थी होण्याचा अधिकार आहे. (स्वातंत्र्यापासूनच्या ७४ वर्षांत सर्व प्रकारच्या सोयी आणि सुविधा या देशात मुसलमानांनाच अधिक मिळाल्या आहेत, तरीही अशा प्रकारचे विधान करणे हा कृतघ्नपणाच होय ! – संपादक)
(म्हणे) ‘मुसलमानांना जाणीपूर्वक लक्ष्य केले जात आहे !’ – काँग्रेस नेते पी. चिदंबरम्
हिंदूंना ‘भगवे आतंकवादी’ ठरवणारे पी. चिदंबरम् याहून वेगळे काय बोलणार ? जर भारतात मुसलमानांना लक्ष्य केले गेले असते, तर पाकिस्तानमध्ये बहुसंख्य मुसलमानांकडून ज्या प्रमाणे हिंदूंचा वंशसंहार झाला, तसा भारतात बहुसंख्य हिंदूंकडून त्यांचा केला गेला असता; मात्र असे काहीच झालेले नाही. या उलट गेल्या ७४ वर्षांत मुसलमान ३ टक्यांवरून १८ टक्क्यांवर पोचले आहेत, ही वस्तूस्थिती आहे !
या वेळी माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम् म्हणाले की, मी आणि अन्सारी दु:खी आहोत; कारण गेल्या काही वर्षांतील घटनाक्रमांमुळे मुसलमानांना धोका निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. त्यांना होत असलेल्या धोक्याची जाणीव आहे. त्यामुळे ते मागे सरत आहेत. भारतात मुसलमान ओळख असलेल्या व्यक्तींना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात येत आहे आणि सध्याचे शासन त्यांना धूर्तपणे लक्ष्य करत आहे.