इस्रोने एकाच वेळी प्रक्षेपित केले ३६ उपग्रह !

या मोहिमेला ‘वन वेब इंडिया-२’ असे नाव देण्यात आले आहे. २३ ऑक्टोबर २०२२ मध्ये इस्रोने या मोहिमेच्या अंतर्गत ३६ उपग्रह प्रक्षेपित केले होते. 

#Exclusive : खेड (जिल्हा रत्नागिरी) बसस्थानकावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांना त्रास !

बसस्थानकांच्या दुरवस्थेची छायाचित्रे पाठवून एस्.टी.ला साहाय्य करा ! राज्य परिवहन मंडळाने बसस्थानकांच्या समस्या समजून घ्यायला हव्यात आणि शासनाने राज्य परिवहन मंडळाच्या अडचणी समजून त्या सोडवणे आवश्यक आहे.

संजय राऊत यांच्याविषयी राज्यसभेचे अध्यक्ष घेणार निर्णय !

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरील हक्कभंगाच्या प्रस्तावित कारवाईने वेग धरला आहे. राऊत यांच्या विरोधातील हक्कभंग प्रस्ताव २५ मार्च या दिवशी विधानसभेत मांडण्यात आला. त्यानंतर तो पुढील कारवाईसाठी राऊत सदस्य असलेल्या राज्यसभेच्या अध्यक्षांकडे पाठवण्यात आला आहे.

आंदोलकांवरील कारवाईअभावी विरोधकांचा सभात्याग !

२ दिवसांपूर्वी विधानभवनात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारून सत्ताधारी भाजप आणि शिवसेना नेत्यांनी आंदोलन केले होते. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षांनी विधानसभेत केली होती…

गोवा : अटल सेतू पूल वाहतुकीसाठी अंशत: खुला

अटल सेतूचा पणजी-म्हापसा भाग पुढील ५ दिवसांत, एकेरी वाहतूक २ एप्रिल या दिवशी, तर सर्व वाहतुकीसाठी हा पूल १० ते १२ एप्रिलपर्यंत खुला करण्यात येणार आहे. डागडुजीच्या कामामुळे अटल सेतू पूल काही दिवस वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता.

मविआच्या आमदारांचे काळ्या पट्ट्या बांधून मूक आंदोलन !

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर निलंबनाच्या कारवाईच्या संदर्भात २५ मार्च या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून मूक आंदोलन केले.

ठाणे जिल्हा परिषदेचे लाचखोर जलसंधारण अधिकारी कह्यात

५० सहस्र रुपयांची लाच घेणारे ठाणे जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाचे जलसंधारण अधिकारी राजेंद्र पाटील यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. 

मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याने त्याची योग्य यंत्रणेकडून चौकशीचा विचार करू ! – देवेंद्र फडणवीस

मुंबई महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता नाही, तसेच निविदा न काढताच कामे देण्यात आली आहेत. पारदर्शकतेचा अभाव, ढिसाळ नियोजन आणि निधीचा निष्काळजीपणे वापर मुंबई महापालिकेने केला आहे, असे निरीक्षण नोंदवून कॅगच्या अहवालात मुंबई महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात आले आहेत.

सावरकर हे देशाचे दैवत आहे ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

आजही काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सावरकरांचा अवमान केला. राहुल गांधी वारंवार सावरकरांचा अवमान का करतात ? सावरकर हे देशाचे दैवत आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी यातना सहन केल्या.