ठाणे जिल्हा परिषदेचे लाचखोर जलसंधारण अधिकारी कह्यात

ठाणे, २५ मार्च (वार्ता.) – तक्रारदाराच्या गावात कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्याचे काम चालू होण्यापूर्वीची प्रशासकीय संमती देण्यासाठी ५० सहस्र रुपयांची लाच घेणारे ठाणे जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाचे जलसंधारण अधिकारी राजेंद्र पाटील यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.