इस्रोने एकाच वेळी प्रक्षेपित केले ३६ उपग्रह !

श्रीहरिकोटा (आंध्रप्रदेश) – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रोने) २६ मार्च या दिवशी ‘एल्.एव्ही.एम्.३-एम्३’ या रॉकेटद्वारे एकाच वेळी ३६ उपग्रह अवकाशामध्ये यशस्वीरित्या प्रक्षेपित केले.

या मोहिमेला ‘वन वेब इंडिया-२’ असे नाव देण्यात आले आहे. २३ ऑक्टोबर २०२२ मध्ये इस्रोने या मोहिमेच्या अंतर्गत ३६ उपग्रह प्रक्षेपित केले होते.